India Japan Bullet Train : भारतावर जपानच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप; बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन वाद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका
शिंकांसेन तंत्रज्ञानावर बोलताना जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा म्हणाले की, मी स्वतः भारतातील शिंकांसेन प्रकल्पात सहभागी होतो, परंतु आंतरराष्ट्रीय बैठका आणि वाटाघाटींमध्ये मला सर्वांत जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे भारतीय बाजूने वारंवार आणि पूर्णपणे केलेला निष्काळजीपणा. युरोपमधून सिग्नलिंग सिस्टीम, ट्रेन सेट आणि तंत्रज्ञान हस्तांतरण खरेदी केल्याबद्दल जपानच्या माजी मंत्र्यांनी भारतावर जोरदार टीका केली. भारताने जपानऐवजी युरोपमधून सिग्नलिंग सिस्टीम खरेदी करण्याचा आणि ट्रेन सेट स्वतःच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
जपानच्या माजी मंत्र्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ते काहीही झाले तरी आपली वचने पाळत नाहीत. जर त्यांनी एखादे वचन दिले, तर ते लगेचच त्यावरून माघार घेतात. ते शेवटपर्यंत फक्त स्वतः च्या फायद्याबद्दलच बोलतात, जबाबदार मंत्र्यांची वृत्ती खूपच वाईट होती, जेव्हा सर्वोच्च अधिकाऱ्याची अशी वृत्ती असते, तेव्हा योग्य संवाद होऊ शकत नाही. त्यांनी पुढे लिहिले, ‘ज्या सर्व जपानी लोकांनी या प्रकल्पात सर्वस्य गुंतवले आहे.
दरम्यान, या टीकेला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून हिदेकी माकिहारा यांनी केलेले सर्व आरोप परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी फेटाळून लावले आहेत. माकिहारा यांचे वक्तव्य हे वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.
Another feather in PM Modi and the Reel Minister’s cap. A former Japanese minister who was personally involved in the India–Japan Shinkansen project has claimed that, despite Prime Minister Takaichi’s visit, the project failed and that Japan was excluded from the signalling… https://t.co/3ISN6NuhmN — Pawan Khera 🇮🇳 ಪವನ್ ಖೇರಾ (@Pawankhera) July 17, 2026
हे देखील वाचा : US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा






