फोटो सौजन्य सोशल मीडिया
यानंतर काही क्षणात धूर आणि आगीने फेरीचा मोठा भाग व्यापला . जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे . परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उद्या घेतल्या .
MV June Aster’ ही फेरी मनिलाहून पालावान प्रांतातील कोरोनकडे जात होती. तब्बल २० तासांहून अधिक काळाच्या प्रवासानंतर कोरोनपासून सुमारे ३९ किलोमीटर अंतरावर असताना फेरीला अचानक आग लागली. काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आग लागण्यापूर्वी फेरीत दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले.
यानंतर काही क्षणांतच धूर आणि आगीने फेरीचा मोठा भाग व्यापला. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या.
Russia-India Aviation : रशियाचं विमान भारताच्या आकाशात! Il-114-300 च्या १०५ विमानांचा मेगा प्लॅन
आग आटोक्यात आणल्यानंतर बचाव पथकांनी फेरीच्या आतील भागात शोधमहीम सुरु केली . फेरीच्या इकॉनॉमी क्लासच्या भागात मोठ्या प्रमाणावर जळालेले अवशेष आढळले . बचाव पथकांनी टप्पाटप्याने मृतदेह बाहेर काढण्यास सुरवात केली . शनिवारी आणखी ४१ मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला .
मृतांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाची मदत घेतली जात आहे . अनेक कुटुंबीय आपल्या नातेवाईकांचा शोध घेत असून , त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण आहे .
या दुर्घटनेत ४३ जण बचावले असले तरी १३ जण अद्याप बेपत्ता आहेत. फिलिपिन्स कोस्ट गार्ड आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर समुद्री सुरक्षा आणि गुन्हेगारी तपासही सुरू करण्यात आला आहे.
फेरीतील आग नेमकी कुठून आणि कशामुळे सुरू झाली, याचा तपास केला जात आहे. स्फोट, कार्गो होल्डमधील परिस्थिती, आपत्कालीन सूचना देण्याची प्रक्रिया आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालक दलाने केलेली कारवाई या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. या दुर्घटनेमुळे फिलिपिन्समधील समुद्री प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






