Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal : मोदींच्या एका विधानाने नेपाळ धास्तावला; भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी बालेन शाह सरकारने उचलले महत्वपूर्ण पाऊल

नेपाळच्या बालेन शाह सरकारने भारतीय पर्यटकांना देशाकडे आकर्षित करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली असून, यामध्ये प्रथमच भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना थेट सहभागी करून घेण्यात आले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 24, 2026 | 03:21 PM
pm modi appeal impact nepal invites indian social media influencers tourism campaign 2026

pm modi appeal impact nepal invites indian social media influencers tourism campaign 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम
  • भारतीय इन्फ्लुएन्सर्सचा आश्रय
  • भव्य प्रतिसाद

PM Modi Tourism Appeal Impact Nepal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना संबोधित करताना एक महत्त्वाचे आवाहन केले होते. भारतीयांनी आपला कष्टाचा पैसा विनाकारण परदेशात जाऊन खर्च करण्याऐवजी देशातीलच विविध पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात, ज्यामुळे भारतातील स्थानिक पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या या एका विधानाने थेट परदेशात खळबळ उडवून दिली आहे. भारताचा शेजारी देश नेपाळ (India-Nepal Relation) , ज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे, तो यामुळे कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता काठमांडूतील बालेन शाह सरकारने भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी थेट भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा (Social Media Influencers) आश्रय घेतला आहे.

नेपाळ सरकारच्या सार्वजनिक मुत्सद्देगिरीचे नवीन पर्व

काठमांडू पोस्ट या प्रसिद्ध नेपाळी वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सार्वजनिक मुत्सद्देगिरीच्या (Public Diplomacy) धोरणात मोठा बदल केला आहे. भारतीय पर्यटकांना नेपाळकडे आकर्षित करण्यासाठी नेपाळ सरकारने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजिटल कंटेंट क्रिएटर्सची मदत घेण्याचे ठरवले आहे. यासाठी नवी दिल्लीतील नेपाळी दूतावासाने भारतातील आघाडीच्या व्लॉगर्स, यूट्यूबर्स, पॉडकास्टर्स आणि इंस्टाग्राम क्रिएटर्सना नेपाळच्या अधिकृत परिचय दौऱ्यावर येण्याचे खुले आमंत्रण दिले आहे. हा दौरा पूर्णपणे नेपाळ सरकार पुरस्कृत असणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Quetta Blast: पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात मोठा बॉम्बस्फोट; आत्मघाती हल्लेखोराने रेल्वे रुळ उडवला, 23 जण ठार, VIDEO

नेपाळ एअरलाइन्स आणि पंचतारांकित हॉटेल्स सरसावले

भारतीय इन्फ्लुएन्सर्सना आकर्षित करण्यासाठी केवळ सरकारच नाही, तर नेपाळमधील संपूर्ण पर्यटन उद्योग एकत्र आला आहे. काठमांडू आणि पोखरामधील अनेक पंचतारांकित हॉटेल्स आणि नेपाळ एअरलाइन्सने या मोहिमेला पूर्ण पाठिंबा दिला आहे. निवडक भारतीय क्रिएटर्ससाठी विमानाची तिकिटे, अलिशान हॉटेल्समधील मुक्काम आणि फिरण्याचा संपूर्ण खर्च नेपाळचा पर्यटन विभाग आणि हॉटेल असोसिएशन मिळून उचलणार आहेत. नेपाळी दूतावासाचे प्रभारी अधिकारी सुरेंद्र थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असून, अवघ्या तीन दिवसांत २०० हून अधिक हाय-प्रोफाइल भारतीय क्रिएटर्सनी यासाठी अर्ज सादर केले आहेत. अंतिम मुदतीपर्यंत हा आकडा १,००० च्या पार जाण्याची शक्यता आहे.

🚨Nepal embassy in Delhi invites Indian social media content creators for sponsored trip to Nepal. pic.twitter.com/I6IMDYTTWL — Indian Infra Report (@Indianinfoguide) May 20, 2026

credit – social media and Twitter

असा असेल भारतीय क्रिएटर्सचा ‘नेपाळ दौरा’

प्राप्त माहितीनुसार, आलेल्या हजारो अर्जांमधून नेपाळ सरकार अत्यंत कडक निकष लावून टॉप ५ ते १० सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची निवड करणार आहे. ज्या क्रिएटर्सचा भारतात मोठा चाहतावर्ग (Followers) आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल. यानंतर नेपाळ पर्यटन मंडळ (Nepal Tourism Board) या निवडक भारतीय क्रिएटर्सना काठमांडूचा ऐतिहासिक वारसा, पोखराचे निसर्गरम्य वातावरण आणि चितवन राष्ट्रीय उद्यानाची थरारक जंगल सफारी घडवून आणणार आहे. हे क्रिएटर्स तिथला अनुभव आपल्या व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय युजर्सपर्यंत पोहोचवतील, ज्यामुळे नेपाळ पर्यटनाची भारतात पुन्हा एकदा मोठी क्रेझ निर्माण होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : philippines Manila Cyclone: चक्रीवादळामुळे 9 मजली इमारत कोसळली; 30 कामगार ढिगाऱ्याखाली गेले गाडले, बाकीच्यांसाठी शर्थीचे प्रयत्न

भारतीय पर्यटकांचे नेपाळच्या अर्थव्यवस्थेतील स्थान

नेपाळसाठी भारत हा केवळ शेजारी देश नसून त्यांच्या पर्यटनाचा सर्वात मोठा स्रोत आहे. दरवर्षी लाखो भारतीय नागरिक रस्ते आणि हवाई मार्गाने नेपाळला भेट देतात. पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन असो वा हिमालयातील ट्रेकिंग, भारतीयांशिवाय नेपाळचे पर्यटन क्षेत्र अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या आवाहनामुळे भारतीय पर्यटकांनी नेपाळकडे पाठ फिरवली, तर नेपाळच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. म्हणूनच, कोणतीही जोखीम न पत्करता नेपाळ सरकारने थेट भारतीय तरुणांच्या पसंतीस उतरणाऱ्या डिजिटल क्रिएटर्सच्या माध्यमातून ही मोठी जाहिरात मोहीम सुरू केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळ सरकारने भारतीय इन्फ्लुएन्सर्सना का आमंत्रित केले आहे?

    Ans: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीय पर्यटकांची संख्या कमी होऊ नये, म्हणून नेपाळ सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय इन्फ्लुएन्सर्सना आमंत्रित केले आहे.

  • Que: नेपाळच्या या मोहिमेत कोणत्या पर्यटन स्थळांचा समावेश आहे?

    Ans: या मोहिमेत भारतीय सोशल मीडिया क्रिएटर्सना प्रामुख्याने काठमांडू, पोखरा आणि चितवन या प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रांची सफर घडवली जाईल.

  • Que: नेपाळ दौऱ्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे?

    Ans: नवी दिल्लीतील नेपाळी दूतावासाने भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून अर्ज मागवण्यासाठी ३० मे २०२६ ही अंतिम मुदत ठेवली आहे.

Web Title: Pm modi appeal impact nepal invites indian social media influencers tourism campaign 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Balen Shah
  • India-Nepal Relation
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rojgar Mela 2026: रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पीएम मोदींनी दिला ‘देशसेवेचा’ कानमंत्र!
1

Rojgar Mela 2026: रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पीएम मोदींनी दिला ‘देशसेवेचा’ कानमंत्र!

Kamal Haasan: “संकट काळात राजकारण नको, देश प्रथम क्रमांकावर हवा”; कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन!
2

Kamal Haasan: “संकट काळात राजकारण नको, देश प्रथम क्रमांकावर हवा”; कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन!

एप्सटिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव म्हणून प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ
3

एप्सटिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव म्हणून प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ

India-Cyprus: भारताच्या युवा शक्तीला मिळणार जागतिक ओळख! मोदी-निकोस यांच्यातील ‘या’ कराराने तरुणांसाठी नोकऱ्यांची सुवर्णसंधी
4

India-Cyprus: भारताच्या युवा शक्तीला मिळणार जागतिक ओळख! मोदी-निकोस यांच्यातील ‘या’ कराराने तरुणांसाठी नोकऱ्यांची सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.