नगरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून शहरात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. काल या पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले असून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्मारकास अभिवादन करण्यात आले. शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा, यासाठी शिवभक्तांनी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने, मोर्चे व निवेदनांद्वारे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या संघर्षाला यश मिळाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.