सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा, याबाबत आज रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत आग लागल्यास तात्काळ व सुरक्षितरीत्या कारवाई करता यावी, यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. प्रात्यक्षिकादरम्यान अग्निशमन यंत्र कसे वापरावे, आग विझविण्याच्या विविध पद्धती, तसेच रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली