नितीन गडकरी यांनी सांगितला 'फुलप्रूफ' प्लॅन
‘या’ कंपनीची Electric Car मिळवण्यासाठी ग्राहकांची धावपळ! रपारप विकल्या 61443 युनिट्स
MLFF किंवा मल्टी-लेन फ्री फ्लो, हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे जे वाहनांना न थांबता हाय स्पीडने टोल प्लाझा ओलांडण्याची परवानगी देईल. सध्या, फास्टॅगमुळे, टोल प्लाझावरील थांबण्याची वेळ अंदाजे 60 सेकंदांपर्यंत कमी झाले आहे. एमएलएफएफच्या अंमलबजावणीमुळे, हा वेळ अजून कमी होऊ शकतो.
नितीन गडकरी यांच्या मते, ही सिस्टम एआय आणि नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञानावर आधारित असेल. उपग्रह आणि कॅमेरे वापरून वाहने ओळखली जातील आणि टोल आपोआप कापला जाईल. यामुळे वाहने 80 किमी/तास वेगाने टोल ओलांडू शकतील.
या नवीन सिस्टममुळे सामान्य प्रवाशांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे टोल प्लाझावरील गर्दी कमी होईल. शिवाय, प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनाची बचत होईल. तसेच, वारंवार ब्रेक लावण्याचा आणि थांबण्याचा त्रास होणार नाही. सरकारच्या मते, या सिस्टममुळे दरवर्षी सुमारे 1500 कोटी रुपयांचे इंधन वाचेल.
Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग
गडकरी म्हणाले की, FASTag लागू झाल्यापासून सरकारच्या महसुलात अंदाजे 5000 कोटींनी वाढ झाली आहे. MLFF सिस्टम पूर्णपणे लागू झाल्यानंतर, सरकारच्या महसुलात आणखी 6000 कोटींनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. शिवाय, टोल चुकवणे आणि अनियमिततेला पूर्णपणे आळा बसेल.
टोल वसुली पूर्णपणे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करणे हे सरकारचे ध्येय असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी असेही नमूद केले की केंद्र सरकार केवळ राष्ट्रीय महामार्गांसाठी जबाबदार आहे, राज्य किंवा शहरातील रस्त्यांसाठी नाही.






