'ऑपरेशन सिंदूर'ची धास्ती! पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द पुन्हा रोखली (Photo Credit - X)
‘ऑपरेशन सिंदूर’चा परिणाम
पाच महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली होती. या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले, मात्र भारताला प्रत्युत्तर देण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. याच वैफल्यातून पाकिस्तानने हवाई बंदीचा निर्णय घेतला आहे.
बंदीचा नेमका स्वरूप काय?
ही बंदी मूळतः २४ डिसेंबर रोजी संपणार होती, परंतु पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने (पीएए) मुदतवाढ जाहीर केली. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय विमान कंपन्यांच्या मालकीची, चालवलेली किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली सर्व भारतीय नोंदणीकृत विमाने पाकिस्तानी हवाई क्षेत्रात उड्डाण करू शकणार नाहीत. ही बंदी भारतीय लष्करी विमानांना देखील लागू होईल.
The prolonged closure has significantly affected flight operations. Around 800 weekly flights operated by Indian airlines have been impacted. Read more: https://t.co/1elGtKvu80#Pakistanairspace pic.twitter.com/Df1ow8HUHY — Scroll.in (@scroll_in) December 17, 2025
पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या २०२२ च्या अहवालानुसार, पाकिस्तानचे हवाई क्षेत्र कराची आणि लाहोर या दोन उड्डाण माहिती क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे. जारी केलेल्या NOTAM (विमानचालकांना सूचना) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ही बंदी या दोन एफआयआर क्षेत्रांना लागू होईल आणि २३ जानेवारी २०२६ पर्यंत लागू राहील.
भारताचे जशास तसे उत्तर
एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा ही बंदी घातली होती. त्याला उत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. दोन्ही देशांमधील या तणावामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून विमानांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे इंधन आणि वेळेचा खर्च वाढला आहे.
तणावपूर्ण द्विपक्षीय संबंध
पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर मे महिन्यात दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून पाकिस्तान वारंवार या बंदीचा कालावधी वाढवत आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची ही कृती केवळ सुरक्षा चिंता नसून भारताच्या वाढत्या लष्करी दबावामुळे निर्माण झालेली भीती आहे.






