Protest in London against Bangladesh's chief advisor Mohammad Yunus
लंडन: सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. याचे पडसाद विदेशी देशांमध्ये देखील दिसून येत आहेत. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान युनूस यांना मोठा झटका लागला आहे. ब्रिटनची राजधानी लंडमध्ये मोहम्मद युनूस यांच्याविरोधात निदर्शने सुरु आहे. शेकडो ब्रिटिश लोक बांगलादेशी मोहम्मद युनूस यांच्या हॉटेलबाहेर त्यांना परत जाण्याच्या घोषणा देत आहेत.
अवामी लीगच्या यूकेतील शाखेशी संबंधित निदर्शकांनी आणि संबंधित संघटनांनी मोहम्मद युनूस विरोधात हा मोर्चा काढला आहे. मोहम्मद युनूस यांच्या बांगलादेशमधील मानवी हक्काचे उल्लंघन, लिंचिंग, हत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा बिघाड केल्याचा आरोप केला आहे. युनूस यांच्यावर जिहादींना मुक्त करण्याचा आणि देशभक्तांना तुरुंगात टाकल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यापूर्वीही जपान दौऱ्यादरम्यान युनूस यांना अशा निदर्शनांना सोमोरे जावे लागले होते. सध्या ब्रिटनमध्ये युनूस गो बॅकचे नारे सुरु आहेत.
निदर्शकांनी युनूसविरोधी घोषणाबाजी केली. त्यांत्या पुतळ्याला बुंटाचा हार घालम्यात आला. तसेच मोहम्मद युनूस आणि त्यांच्या प्रेस सेक्रेटरी शफीकुल आलम यांचे पोस्टर जाळण्यात आले, फोटो कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले. अवामी लीगच्या समर्थक मोहम्मद युनूस यांचे बॅनर्स, पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांच्याविरोधात मोहम्मद गो बॅक अशी घोषणाबाजी केली.
तसेच शेख हसींनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सध्या बांगलादेशातही राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. मोहम्मद युनूस यांच्याविरोधात लोकांमध्ये रोष वाढत आहे.
निदर्शकांनी मोहम्मद युनूस यांचे प्रेस सेक्रेटरी शफीकुल आलम यांच्याविरोधात घोषणा दिल्या. निदर्शकांनी त्यांना घेरले आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिश पोलिसांना निदर्शकांना तिथून पळवून लावले. यामुळे सेक्रेटरीचा जीव वाचला.
निदर्शकांनी मोहम्मद युनूस यांचे प्रेस सेक्रेटरी शफीकुल आलम यांच्याविरोधात घोषणा दिल्या. निदर्शकांनी त्यांना घेरले आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिश पोलिसांना निदर्शकांना तिथून पळवून लावले. यामुळे सेक्रेटरीचा जीव वाचला.
मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. युनूस देशात दहशतवाद्यांच्या मदतीने सत्तेत आल्याचे विरोधी पक्ष अवामी लीगने म्हटले आहे. तसेच कट्टरपंथीं जमात-ए-इस्लामीने देखील लवकरात लवकरत निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. युनूस यांच्या निर्णयाला सर्वत्र विरोध होत आहे.