Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pulwama हल्ल्याचा बदला? मास्टरमाइंड हमजा बुर्हान ठार; हत्येमागे भारताच्या ‘या’ कुख्यात गँगचा हात?

Bishnoi Gang killed Pulwama Mastermind Burhan : भारताच्या मोस्ट वॉन्टेट यादीत असलेला आणि पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार बुर्हानची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये त्याला ठार करण्यात आले असून त्याच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 10:35 AM
Lawrence Bishnoi Gang on Hamza Burhan

Lawrence Bishnoi Gang on Hamza Burhan

Follow Us
Follow Us:
  • Pulwama हल्ल्याचा बदला?
  • मास्टरमाइंड हमजा बुर्हान ठर
  • हत्येमागे भारताच्या ‘या’ कुख्यात गँगचा हात?
Lawrence Bishnoi Gang on Hamza Burhan:  भारतातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या पुलवामा हल्ल्याचा (Pulwama Attack) मुख्य सुत्रधार हमजा बुर्हान याची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या काश्मीर खोऱ्यातील मुझफ्परबाद येथे अदांधुंद गोळीबारात त्याला ठार करण्यात आले असून या हल्ल्यांची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅँगने स्वीकारल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. परंतु अद्याप अधिकृतपण याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या

पुलवामा हल्ल्याचा बदला?

१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर लेथपोरा येथे CRPF च्या ताफ्यावर भीषण आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताच्या ४० जवानांचा बळी गेला होता. यामुळे संपूर्ण देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. दरम्यान २०२२ मध्ये भारताने  अल बद्र चा टॉप कमांडर अरजमंद गुलजार उर्फ बुर्हान हमजाला कुख्यात दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले होते. तो पुलवामा हल्ल्याचा मुख्य सुत्रधार होता.

लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी

सोशल मीडियावर टायसन बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. हे अकाऊंट लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असून यामध्ये हमजाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, आम्ही आमचे भाऊ लॉरेंन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि डीसी ग्रुपच्या मदतीने पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. पुलवामा हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हमजा बुर्हान याला पाकिस्तानात घुसून ठार केले आहे.

Tyson Bishnoi 💀 https://t.co/yXkirFzYEG pic.twitter.com/7pfyCDaiW6 — Rudraksh (@Intel_Jackal) May 22, 2026


या पोस्टद्वारे टायसन बिश्नोईने भारतीय तपास यंत्रणेच्या कामावर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या ऑपरेशन ग्लोबल हंटमध्ये टायसन नाव सामील केल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही अमली पदार्थांना हात लावलेला नाही. माझ्यावरील ड्रग्ज तस्करीचे खोटे आरोप लावण्यात आले असल्याचे टायसनने म्हटले. त्यानी म्हटले की, त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले, तर तो स्वत: भारतात येऊन पोलिसांना शरण जाईल.

देशाच्या शत्रूंना इशारा

याशिवाय टायसनने स्वत:ला भारताचा पुत्र मानत देशाच्या शत्रूंना उघड धमकी दिली आहे. आम्ही आमची लढाई लढत असून कायदा हातात घेतल्याचे स्वीकारले आहे. भारताच्या कोणत्याही शत्रूला सोडणार नाही, अशी उघड धमकी टायसनने दिली आहे. देशाच्या शत्रूंची यादी आमच्याकडे असून एक एक करुन सर्वांचा खात्मा केला जाईल असे म्हटले आहे. सध्या या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

Trump Iran Uranium : इराण उद्ध्वस्त होणार? युरेनियम संवर्धानाबाबत दिला थेट इशारा; होर्मुझवरही आक्रमक भूमिका

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानात मारलेला गेलेला दहशतवादी हमजा बुर्हान कोण होता?

    Ans: हमजा बुर्हान हा भारतात जम्मू-श्रीनगर येथे झालेल्या पुलवामा हल्ल्याचा मुख्यसूत्रधार होता. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. हमाजावर दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आणि काश्मीर खोऱ्यातील तरुणांना दहशतवाद्याच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.

  • Que: हमजा बुर्हानच्या हत्येची जबाबदारी कोणी घेतली आहे?

    Ans: हमजा बुर्हानच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. गँगशी संबंधीत टायसन बिश्नोईने सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँग आणि डीसी ग्रुपने संयुक्तपणे पाकिस्तानात घुसून हमजाला ठार केल्याचे म्हटले आहे.

Web Title: Pulwama mastermind hamza burhan killed pakistan lawrence bishnoi gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Lawrence Bishnoi
  • Pulwama Attack
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.