Trump Iran Uranium : इराण उद्ध्वस्त होणार? युरेनियम संवर्धानाबाबत दिला थेट इशारा; होर्मुझवरही आक्रमक भूमिका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या इरणकडे सुमारे ९०० पाऊंड समृद्ध संवर्धित युरेनियमचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हा साठा अणुप्रकल्पांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी, हा साठा गाडालेला राहिला तर काही हरकत नाही अशी मवाळ भूमिका घेतली होती. यानंतर दोन्ही देशांत शांतता चर्चेचे संकेत मिळाले होते. आता मात्र, ट्रम्प पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे.
याशिवाय जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी सागरी मार्ग होर्मुझवरुन दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) वरुन सध्या इराण आणि ओमान संयुक्तपणे एक टोल यंत्रणा सुरु करण्याचा विचार करत आहेत. या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च येत असल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या परदेशी कंपन्या आणि देशांकडून शुल्क वसूल केले जावे अशी इराणने भूमिका मांडली आहे.
मात्र ट्रम्प यांनी इराणच्या या टोल योजनेला पूर्णपणे नकार दिला आहे. या मार्गावर कोणताही टोल खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट ठणकावून सांगितले आहे. पश्चिम आशियातील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका कोणत्याही प्रकारची सवलत मान्य करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प सातत्याने इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे, ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यात फोनवर संवादादरम्यान वाद झाला आहे. इराणवर हल्ला रोखल्याने नेतन्याहूंनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु ट्रम्प यांनी कतार, सौदी अरेबिया आणि यूएईच्या मध्यस्थीनंतर शांततेला एक संधी देणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.मात्र, नेतन्याहू इराणला पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद, पश्चिम आशियातील तणावाला काय वळण देताता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेत, इराणचा अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न रोखणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्यावर अमेरिका ताबा घेणार असून गरज पडल्यास तो नष्टही करण्यात येईल असे त्यांनी म्हटले.
Ans: इराण ओमानच्या मदतीने होर्मुझमधून जाणाऱ्या परदेशी कंपन्या आणि देशांकडून टोल वसूल करण्याची योजना आखत आहेत. सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च येत असल्याने हा टोल वसूल करण्याचा इराणचा उद्दिष्ट आहे. मात्र, ट्रम्प यांनी याला पूर्णपणे विरोध केला आहे.






