Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अल बद्र चा टॉप कमांडर अरजमंद गुलजार उर्फ बुर्हान हमजा हा मूळचा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथील रहिवासी होता. तो गेल्या ७ वर्षांपासून पाकिस्तानात आश्रयित होता. २०१९ मध्ये भीषण पुलवामा हल्ल्याच्या मुख्य सुत्रधार म्हणून त्याचे नाव समोर आले होते.
परंतु कायदेशीर कागपत्रांच्या आधारे त्याने पाकिस्तानात पळ काढला. येथे त्याने अल बद्र या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला आणि त्याच्या क्रूर, आक्रमक भूमिकेमुळे काही काळातच संघटनेचा प्रमुख बनला.
हमजा पाकिस्तानातून काश्मीर तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याचे काम करत होता. सोशल मीडियावरुन काश्मीरच्या खोऱ्यातील तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना शस्त्रे पुरवणे आणि दहशतवादी कारवायांसाठी टेरर फिंडगची जबाबादरी त्याच्याकडे होती. त्याच्या या कारवायांमुळे भारताने २०२२ मध्ये त्याला अधिकृतपणे मोस्ट वॉन्टेड यादीत सामाविष्ट केले होते.
हमजा गेल्या अनेक काळापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायाचा घडवून आणण्यात सक्रिय होता. त्याने डिजिटल कट्टरवाद मॉडेलचा वापर करुन गुलजार खोऱ्यात अशांताता पसरवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सध्या हमजाच्या हत्येचा तपास सुरु असून अद्याप हल्लेखोराचा सुगावा लागलेला नाही. परंतु त्याच्या हत्येने भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि काश्मीरच्या शांततेसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर मोठा आत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये ४० भारतीय जवान शहीद झाले होते. बुर्हान या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार होता. त्याची अज्ञात हल्लेखोरांनी मुझफ्फरबाद येथे गोळ्या झाडून हत्या केली आहे.






