रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियामध्ये संतापाचे वातावरण आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तीव्र संतापले आहेत. सध्या पुतिन ॲक्शन मोडमध्ये आहेत. यामुळे युक्रेनला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने तयारी सुरु केली असल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे रशियाने आपली प्राणघातक शस्त्रे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रशियाच्या अध्यक्षांच्या जवळचे सहकारी उत्तर कोरियाला गेले आहेत.
रशिया हा सर्वात शक्तीशाली देश आहे. तसेच त्याची शस्त्रास्त्र ताकद देखील तेवढीच शक्तीशाली आहे.रशिया देखील आता युक्रेनविरुद्ध मोठ्या प्रत्युत्तराची तयारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या जवळचे मानले जाणारे रशियाचे सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात सर्गेई उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये हुकूमशाह किम जोंग उन यांची भेट घेणार आहे. किम जोंग उन यांच्याशी महत्त्वाची बैठक होणार आहे. रशिया आणि उत्तर कोरियाच्या संरक्षण कराराच पहिला वर्धापदिना आधी ही भेट होत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनही लवकरच किम जोंग उन यांना भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे.
ही बैठक पुतिन यांच्या युक्रेनविरोधी मोहीमेचा भाग?
रशियाची वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, सर्गेऊ शोईगु यांची भेट विशेष कारणांसाठी होत आहे. या बैठकीत रशिया आणि उत्तर कोरियात जून २०२३ मध्ये झालेल्या धोरणात्मक संरक्षण कराराचा आढवा घेतला जाणार आहे. तसेच उत्तर कोरिया रशियाला यापूर्वी युक्रेनविरोधात हजारो सैनिकही पाठवले होते.
सध्याच्या बैठकीत देखील युक्रेनविरोधात डाव रचला जाण्याची शक्यता आहे. बैठकीत रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा होणार आहे. TASS या रशियन वृत्तसंस्थेने सुरक्षा परिषदेचा हवाला देत, शोइगब आणि किम यांच्यात युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढण्यासाठी सैनिकांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेत युक्रेन संकट आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा होईल. तसेच रशियावरील निर्बंधांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच गेल्या तीन महिन्यांत शोइगू यांची उत्तर कोरियाला ही तिसरी भेट आहे. तसेच काही दिवसांपूर्ण उत्तर कोरियाचे राज्य सुरक्षा मंत्री री चांग डे यांनीही मॉस्कोला भेट दिली होती. येथे त्यांनी शोइगू यांची भेट घेतली होती. प्रत्येक भेटीदरम्यान रशिया आणि युक्रेन युद्धाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच उत्तर कोरियाने आपला संपूर्ण पाठिंबा रशियाला दर्शवला आहे. युद्धात सहकार्य आणि लष्करी पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली आहे.
दोन्ही देशांत तंत्रज्ञान आणि सैनिक असा सौदा करण्यात आला आहे. उत्तर कोरियाला रशियाला सैन्य आणि शस्त्रे पुरवत आहे. या बदल्यात रशिया उत्तर कोरियाला प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाची मदत करत आहे. अशा परिस्थितीत ही भागीदारी केवळ लष्करी नव्हे तर धोकादायक धोरणात्मक युती आहे. ही युती युक्रेनवर भारी पडण्याची शक्यता आहे.