नोबेल हुकल्यावर अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या कित्येक महिन्यापासून चर्चेचा विषय असणाऱ्या नोबेल शांतता पुरस्काराच्या नावावर अखेर आज पडदा पडला. डोनाल्ड ट्रम्प यांना डावलून २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाल्यानंतर अमेरिकेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नोबेल समितीने शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचे सिद्ध केले आहे असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे आणि यामध्ये संतप्त प्रतिक्रिया देत आपले शांततेचे काम असेच पुढे चालू ठेवणार असल्याचेही सांगितले आहे. नक्की काय आहे ही प्रतिक्रिया जाणून घेऊया
शांततेपेक्षा राजकारण: अमेरिका
ओव्हल ऑफिसने म्हटले आहे की मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन नोबेल समितीने शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले आहे. व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीव्हन चुएंग यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की, “नोबेल समितीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांततेला चालना देण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले आहे. असे असूनही, ट्रम्प शांततेसाठी प्रयत्न करत राहतील. ते युद्धे संपवत राहतील आणि जीव वाचवत राहतील. ते मानवतावादी करुणेचे माणूस आहेत.”
President Trump will continue making peace deals, ending wars, and saving lives. He has the heart of a humanitarian, and there will never be anyone like him who can move mountains with the sheer force of his will. The Nobel Committee proved they place politics over peace. https://t.co/dwCEWjE0GE — Steven Cheung (@StevenCheung47) October 10, 2025
“मारिया कोरिना लाखो लोकांना प्रेरणा देतील”
नॉर्वेजियन नोबेल समितीने घोषणा केली आहे की त्यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे. नोबेल समितीने पुढे म्हटले आहे की, त्यांच्या जीवाला गंभीर धोका असूनही, मारिया कोरिना यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. त्यांची निवड निश्चितच लाखो लोकांना प्रेरणा देईल.
या देशांनी ट्रम्प यांना नामांकन दिले
व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्याने ट्रम्प यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून, ते अनेक देशांमध्ये युद्धे संपवण्याचा दावा करत नोबेल शांतता पुरस्कारासाठी आपला दावा करत आहेत. इस्रायल, रशिया, अझरबैजान, पाकिस्तान, थायलंड, आर्मेनिया आणि कंबोडिया सारख्या देशांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नामांकन दिले आहे.
या वर्षी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी ३३८ नामांकन मिळाले होते, ज्यात ९४ संस्था आणि विविध क्षेत्रातील २४४ व्यक्तींचा समावेश होता. ट्रम्प यांनी दावा केला की ते इतिहासातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी नऊ महिन्यांच्या कालावधीत आठ युद्धे सोडवली आहेत.
Nobel Peace Prize 2025 Live: नोबेल शांतता पुरस्काराची आज घोषणा, डोनाल्ड ट्रम्पला मिळणार का?