पॅन्टसिर एअर सिस्टीम (फोटो- विकीपीडिया )
नवी दिल्ली: रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हे सर्व जग जाणून आहे. रशिया हा भारताचा अत्यंत जुना आणि विश्वासू मित्र आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देखील अत्यंत चांगले असे संबंध आहेत. दरम्यान भारत आणि रशिया यांच्यात अनेक प्रकारचे करार होत असतात. अनेक आधुनिक शस्त्र प्रणाली आपण रशियाकडून खरेदी करत असतो. आता देखील रशिया आपल्याला एक आधुनिक अशा प्रकारचे शस्त्र पुरवणार आहे. भारताने आपली एअर सिस्टिम मजबूत करण्यासाठी एक करार केला आहे.
भारत डायनामिक्स लिमिटेडने रशियासोबत एक करार केला आहे. हा करार आधुनिक पॅन्टसिर एअर डीफेन्स गन सिस्टिमसाठी झाली आहे. हा करार रोसोबोरोन एक्सपोर्टसोबत केला आहे. यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. दरम्यान पॅन्टसिर शस्त्रप्रणाली कशाप्रकारे काम करते आणि याचा फायदा कसा होतो हे जाणून घेऊयात.
पॅन्टसिर एअर डीफेन्स मिसाईल गन सिस्टिम ही मोबाइल शॉर्ट रेंज डीफेन्स सिस्टिम आहे. यामध्ये मिसाईल आणि गन या दोन्ही फिट होतात. ही सिस्टिम म्हणजे परफेक्ट सुरक्षा असल्याचे रशियाच्या कंपनीने म्हटले आहे. लहान लष्करी, औद्यागिक, प्रशासनिक फॅसीलिटीज हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी ही एअर डीफेन्स सिस्टिम तयार करण्यात आली आहे.
या सिस्टिमचे खास वैशिष्ट्ये काय?
पॅन्टसिर एस -१ एअर डीफेन्स सिस्टिम ही एक हजार मीटर प्रती सेकंदाच्या वेगाने हालचाल करते. याच्या मदतीने एकाच वेळेस चार टार्गेट लक्ष्य करता येतात. ही आधुनिक आणि ट्रॅकिंग रडार सिस्टिम आहे. ही एअर डीफेन्स सिस्टिम ३६ किमी लांब आणि १५ किमी लांब उंचीवरील टार्गेट शोधून काढते. काही लक्ष्य ही एअर डीफेन्स सिस्टिम हवेतच नष्ट करते.
हेही वाचा: युक्रेन-रशिया युद्धात भारत करणार मधस्थी; अजित डोवाल यांच्यावर असणार कमान
युक्रेन-रशिया युद्धात भारत करणार मधस्थी
युक्रेन-रशिया या दोन्ही देशांतील युद्ध अद्यापही सुरुच आहे. हे युद्ध लवकर थांबेल असे वाटत होते. मात्र, अजूनही या दोन्ही देशांत समझोता झाला नसल्याचे समोर आले आहे. असे असताना आता युक्रेन-रशिया युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर आता भारतानेही मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्याकडे कमान सोपण्यात आली आहे. सध्या रशिया-युक्रेन या दोन्ही देशांत युद्ध सुरु झाले आहे. मात्र, हे युद्ध थांबवण्याबाबत व्लादिमीर पुतिन यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. युक्रेन-रशिया युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यात आता पुतीन यांच्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे.