Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UN Blacklist : दहशतवादी संघटनांच्या यादीत रशिया-इस्रायल? UN च्या ‘या’ निर्णयाने जग हादरलं

UN Blacklist : संयुक्त राष्ट्रांच्या युद्धकाळात सामान्य नागरिकांवर लैंगिक हिंसाचाराच्या अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी इस्रायल आणि रशियाला Black List मध्ये टाकले आहे. दोन्ही देशावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 12:51 PM
United Nations Secretary-General António Guterres

United Nations Secretary-General António Guterres

Follow Us
Follow Us:
  • दहशतवादी संघटनांच्या यादीत रशिया-इस्रायल?
  • UN च्या ‘या’ निर्णयाने जग हादरलं
  • पुतिन-नेतन्याहू अडचणीत
UN Blacklist : संयुक्त राष्ट्रांनी एक खळबळजनक आणि धाडसी निर्णय घेतला आहे. रशिया (Russia) आणि इस्रायलला ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. युद्धकाळात सामान्य नागरिकांवर लैंगिक हिंसाचाराच्या घटनांचा आरोप या दोन्ही देशांवर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुरक्षा परिषदेच्या सुत्रांकडून माहिती मिळाल्याचा हवाला दिला आहे. मात्र, या निर्णयाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

Ajit Doval Moscow Visit : ‘दहशतवादाविरोधात दुहेरी मापदंड खपवून घेणार नाही’ ; मॉस्कोतून अजित डोवाल यांची मोठी घोषणा

काय आहे ब्लॅकलिस्ट?

संयुक्त राष्ट्र(UN) दरवर्षी एक अशी यादी प्रसिद्ध करते, ज्यामध्ये युद्ध, संघर्षाच्या काळात सामान्य नागरिकांवर सामूहिकपणे लैंगिक अत्याचार करणाऱ्या सरकारी, बिगर-सरकारी संघटनांचा समावेश असतो. यामद्ये आतापर्यंत सुदान, हौथी, कॉंगो, म्यानमार, सीरिया यांसारख्या देशांतील अशा संघटनाचा समावेश आहे. आता यामध्ये रशिया आणि इस्रायलचेही नाव जोडले गेले आहे.

रशिया आणि इस्रायल गंभीर गुन्ह्यांचे आरोप

UN ने इस्रायल(Israel)वर वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. अहवालानुसार, इस्रायलच्या सैन्याचा २०२३ पासून १४ पुरुष, ९ मुले, ७ महिला आणि १ एका चिमुकल्यामुलीलवर अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये लैंगिक हिंसाचाराला छळाचे शस्त्र म्हणून वापरले असल्याचा आरोप आहे. इस्रायलने मात्र, या अहवालाला फेटाळले असून निरर्थक आणि लाजिरवाणा असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे रशियावर देखील युक्रेनच्या नागरिकांचा अमानुष छळ केल्यचा आरोप आहे. या संदर्भात तब्बल ३१० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांवरही ३१ प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचाराचे आरोप ठोठवण्यात आले आहेत.

आधीच देण्यात आला होता इशारा ?

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गेल्या वर्षी दोन्ही देशांना कडक इशारा दिला होता. दोन्ही देशांनी आपल्या लष्करी व्यवस्थेत सुधारणा न केल्यास त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. परंतु दोन्ही देशांच्या सैन्यांकडून सामान्यांचा अमानुष छळ सुरुच राहिला. यामुळेचे संयुक्त राष्ट्राने हे कठोर पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

Russia Taliban Deal : पाकिस्तानचे दाबे दणाणले! रशिया-तालिबानमध्ये सर्वात मोठा संरक्षण करार, जगभरात खळबळ

Web Title: Russia israel in un blacklist sexual violence report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Israel
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव
1

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?
2

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप
3

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?
4

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.