Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले

Russia Iran Relations : जागतिक राजकारणात सध्या मोठा बदल घडताना दिसत आहे. रशिया आणि इराणची मैत्री अधिक घट्ट होताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्रात इराणचे समर्थन करत रशियाने अमेरिकेला सुनावले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 01:18 PM
Russia President Vladimir Putin and Iran FM Abbas araghchi

Russia President Vladimir Putin and Iran FM Abbas araghchi

Follow Us
Follow Us:
  • जागतिक राजकारणात नवा ट्विस्ट
  • इराणच्या मदतीसाठी धावला रशिया
  • संयुक्त राष्ट्रात थेट अमेरिकेला ललकारले
Russia Support Iran in UN : मॉस्को : अमेरिका इराणमधील संघर्ष आता केवळ जमिनीपर्यंत मर्यादित न राहता समुद्रातही पेटला आहे. यामुळे जागतिक व्यापारात मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी(२७ एप्रिल) संयुक्त राष्ट्रांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत इराणविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. मात्र, रशियाने या बैठकीत  इराणचे जोरदार समर्थन करत पाश्चात्य देशांना खडे बोल सुनावले.

US Iran Peace Talks : ट्रम्प संतापले! अणु कारारावरुन अमेरिका इराणमध्ये मोठा राडा, आता थेट युद्ध होणार?

रशियाने संयुक्त राष्ट्रात इराणला पाठिंबा देत, स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग  कायदेशीररित्या बंद करण्याचा अधिकार असल्याचे त्याला असल्याचे सांगितले. तर अमेरिकेची तुलना २१ व्या शतकातील समुद्री डाकू अशी केली.

पुतिन-अराघची भेट

एकीकडे संयुक्त राष्ट्रात रशियाने इराणची बाजू घेतली, तर दुसरीकडे सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इराणचे परराष्ट्रा मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली आहे. या भेटीने रशिया आणि इराणचे संबंध केवळ राजनैतिक नसून सागरी भागीदारीचेही आहेत आणि रशिया इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

रशियाचा अमेरिकेवर हल्लाबोल

संयुक्त राष्ट्रातील रशियाचे स्थायी प्रतिनिधी वासिली नेबेंजिया यांनी इराणच्या बाजूने रशियाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी अमेरिकेसह पाश्चात्य देशांना सुनावले. त्यांनी म्हटले की, जे देश स्वत:ला आंतरराष्ट्रीय कायद्याचा रक्षक समजतात, तेच देश समुद्रात लुटमार करत आहेत. पाश्चात्य देशांची इराणवर दबाव टाकण्याची रणनीती ही समुद्री डाकूसारखी असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, इराणला त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्री नाकेबंदी सार्वभौम अधिकार आहे. अमेरिका आणि युरोपीय देश स्वत:च्या सोयीनुसार, आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर करतात असाही आरोप करण्यात आला. रशियाच्या मते, इराणने त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्रात नाकेंबदी केली तो धोका आणि हेच पाश्चात्य देशांनी केले तर त्याला नियम मानले जाते जो उघडपणे पाखंडीपणा आहे असे रशियाने म्हटले.

सध्या रशियाच्या या भूमिकेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा मार्ग जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा आहे. परंतु यावर इराणचे नियंत्रण योग्य असल्याचे रशियाने म्हटल्याने येणाऱ्या काळात  तेल पुरवठा आणि सागरी सुरक्षेवरुन महासत्तांमध्ये संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष आता अमेरिका यावर काय भूमिका घेते याकडे लागले आहे.

US Iran Tension : पाकिस्तान फेल! आता UN ने सांभाळला मध्यस्थीचा मोर्चा, इराणला होर्मुझ खुला करण्याचा अल्टीमेटम

Web Title: Russia supports iran in unsc slams america and europian countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • America
  • Iran News
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
1

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
2

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
3

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
4

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.