संपूर्ण जग अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षात अडकले आहे, तर दुसरीकडे रशिया-युक्रेनने युद्धविराम जाहीर केला असून, त्याला पुतिन यांनी मंजुरी दिली आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Russia Ukraine Ceasefire Easter 2026 : जगभरात जेव्हा अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने तणाव निर्माण झाला आहे, तेव्हा रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war) या दोन पारंपरिक शत्रूंनी घेतलेला एक निर्णय सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऑर्थोडॉक्स इस्टरच्या पवित्र सुट्टीनिमित्त युक्रेनसोबत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेपासून ते १२ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत ही शस्त्रसंधी लागू राहणार आहे. रशियाच्या या प्रस्तावाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, युक्रेनही या काळात कोणतीही लष्करी कारवाई करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय असलेल्या क्रेमलिनने गुरुवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. निवेदनानुसार, रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह यांनी सरसेनापती वॅलेरी गेरासिमोव्ह यांना लष्करी कारवाया थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. रशियाने म्हटले आहे की, इस्टर हा सण दोन्ही देशांमधील नागरिकांसाठी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही भीतीशिवाय प्रार्थना करावी या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. मात्र, रशियाने असा इशाराही दिला आहे की, जर युक्रेनकडून या काळात कोणताही हल्ला झाला, तर रशियन सैन्य सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran No Talks : इस्लामाबाद किल्ल्यासारखं सजवलं, पण पाहुणेच गायब; इराणचा शांतता चर्चेला सणसणीत नकार, त्यात पाकिस्तानचा अपमान
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी टेलिग्रामवर पोस्ट करत सांगितले की, युक्रेनने यापूर्वीही अशा शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता. “लोकांना शांततेने इस्टर साजरा करण्याची संधी मिळाली पाहिजे. रशियाकडे ही सुवर्णसंधी आहे की त्यांनी इस्टरनंतरही हे हल्ले पुन्हा सुरू करू नयेत,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, २४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या या युद्धात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो सैनिकांनी प्राण गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर ३२ तासांची ही शांती दोन्ही देशांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
BREAKING: Putin announced an Easter ceasefire between Russia and Ukraine According to the Kremlin, the ceasefire will last from 16:00 on April 11 until the end of the day on April 12, 2026. pic.twitter.com/lrwi9hxNQp — Visegrád 24 (@visegrad24) April 9, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MQ4C Triton : अमेरिकेचा 1600 कोटींचा ‘ट्रायटन’ हवेतच गायब; आखातात रोज 3 हजार कोटींचा धूर, रहस्यमय ‘सिग्नल’ने खळबळ
युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी, प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. या घोषणेनंतर काही तासांतच डनिप्रोपेत्रोव्स्क प्रदेशात रशियन तोफखाना आणि ड्रोन हल्ल्यात दोन नागरिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीही अशाच प्रकारचा अल्पकालीन युद्धविराम जाहीर करण्यात आला होता, मात्र दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप केला होता. त्यामुळे यंदाचा हा इस्टर खरोखरच शांततेत पार पडणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या दरम्यान ही बातमी आल्याने जागतिक राजकारणात सकारात्मक वारे वाहू लागले आहेत.
Ans: हा युद्धविराम ११ एप्रिल २०२६ रोजी मॉस्को वेळेनुसार दुपारी ४ वाजता सुरू होईल आणि १२ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत चालेल.
Ans: ऑर्थोडॉक्स इस्टर (Orthodox Easter) या पवित्र सणानिमित्त नागरिकांना शांततेत प्रार्थना करता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.
Ans: झेलेन्स्की यांनी या युद्धविरामाला दुजोरा दिला असून युक्रेन त्याचे पालन करेल आणि शस्त्रसंधी मोडणार नाही, असे आश्वासन दिले आहे.






