Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peace Talks : क्रेमलिनमध्ये रंगली सत्ता-सूत्रांची चर्चा; ट्रम्पचे दूत आणि पुतीन यांनी ठरवला युक्रेनच्या भविष्याचा टर्निंग पॉइंट

Russia-Ukraine War: युक्रेनियन युद्ध संपवण्यासाठी रशिया आणि अमेरिका मॉस्कोमध्ये भेटले. ट्रम्प यांनी दावोसमध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली. युएईमध्ये त्रिपक्षीय चर्चा आणि शांतता प्रयत्नांना तीव्रता मिळाली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 23, 2026 | 11:01 AM
russia ukraine war peace talks putin trump envoys moscow meeting davos 2026

russia ukraine war peace talks putin trump envoys moscow meeting davos 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मॉस्कोमध्ये मध्यरात्री खलबतं
  • दावोसमध्ये ट्रम्प-झेलेन्स्की भेट
  • UAE मध्ये त्रिपक्षीय बैठक

Putin Trump envoys meeting Moscow 2026 : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाला(Russia Ukraine war) पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाची राजधानी मॉस्को आणि स्वित्झर्लंडमधील दावोस या दोन शहरांमध्ये सध्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राजनैतिक हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार, युद्ध थांबवण्यासाठी ‘बॅकडोर’ डिप्लोमसी वेगाने सुरू केली आहे.

मॉस्कोमधील ती ऐतिहासिक रात्र

गुरुवारी मध्यरात्री मॉस्कोमधील ‘क्रेमलिन’मध्ये एक मोठी घडामोड घडली. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी सुमारे चार तास चर्चा केली. रात्री १२ च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक शुक्रवारी पहाटे ३ वाजेपर्यंत चालली. या बैठकीत रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह आणि किरिल दिमित्रीव्ह हेदेखील उपस्थित होते. या चर्चेचे वर्णन “अत्यंत प्रांजळ आणि फलदायी” असे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Balasaheb Thackeray: निवडणूक न लढवताही त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले; बाळ ठाकरेंचे ‘असे’ रहस्य ज्यामुळे सरकारही होते हादरले

दावोसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची खलबतं

मॉस्कोमध्ये चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हे युद्ध केवळ आर्थिक मुद्दा नसून लाखो लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यांनी जो बायडेन यांच्या धोरणांवर टीका करताना म्हटले की, “युक्रेनवर ३५० अब्ज डॉलर्स खर्च झाले आहेत आणि दरमहा हजारो सैनिक मारले जात आहेत, हे आता थांबायला हवे.” झेलेन्स्की यांनी या भेटीला सकारात्मक म्हटले असून, सुरक्षा हमी आणि हवाई संरक्षण (Air Defence) पॅकेजवर महत्त्वाचा करार झाल्याचे संकेत दिले आहेत.

President Trump said he ‍thinks ‍peace efforts over Russia’s ⁠war in Ukraine are getting close ​ahead of his planned ‍meeting with Ukraine’s Volodymyr ⁠Zelenskyy later on Thursday in Davos, while his ⁠special ​envoys ⁠are prepared to ‍meet with Russia’s ‌Vladimir Putin in… pic.twitter.com/tfZhzlgO8c — NEWSMAX (@NEWSMAX) January 22, 2026

credit – social media and Twitter

UAE: शांतता चर्चेचे नवीन केंद्र

या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी आता केवळ द्विपक्षीय चर्चा पुरेशी ठरत नाहीये. त्यामुळेच संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्यात एक त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत युद्धाचा नकाशा (Roadmap) आणि सीमावादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. रशियाने ‘टेरिटोरियल’ (प्रादेशिक) मुद्द्यावर तडजोड करण्याची मागणी केली असून, युक्रेन आपल्या सार्वभौमत्वासाठी अडून बसला आहे.

हे देखील वाचा : Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर

युरोपवर झेलेन्स्कींचा हल्लाबोल

दावोसमध्ये बोलताना झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला आरसा दाखवला. ते म्हणाले, “युरोप भविष्याबद्दल चर्चा करण्यात वेळ घालवत आहे, पण आज आवश्यक निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे.” अमेरिकेचे पूर्ण लक्ष आता शांतता करारावर असताना युरोप मात्र दिशाहीन झाल्याची टीका त्यांनी केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया आणि अमेरिकेचे दूत मॉस्कोमध्ये का भेटले?

    Ans: युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आणि शांतता कराराचा मसुदा तयार करण्यासाठी पुतिन आणि ट्रम्पच्या दूतांमध्ये ही बैठक झाली.

  • Que: झेलेन्स्की यांनी युरोपवर काय टीका केली?

    Ans: युरोप भविष्यातील संकटांवर फक्त चर्चा करतो, पण आज ठोस लष्करी किंवा राजकीय निर्णय घेण्यास घाबरतो, असे झेलेन्स्की यांनी म्हटले.

  • Que: UAE मध्ये होणारी त्रिपक्षीय बैठक का महत्त्वाची आहे?

    Ans: यामध्ये रशिया, युक्रेन आणि अमेरिका प्रत्यक्ष चर्चेसाठी एकाच व्यासपीठावर येणार असल्याने युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Web Title: Russia ukraine war peace talks putin trump envoys moscow meeting davos 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia and Ukraine war
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky

संबंधित बातम्या

Davos 2026 : ‘Board of Peace’ की ‘Piece’ एलोन मस्क यांनी दावोसमध्ये ट्रम्पची उडवली खिल्ली; म्हटले यांना फक्त जगाचे तुकडेच…
1

Davos 2026 : ‘Board of Peace’ की ‘Piece’ एलोन मस्क यांनी दावोसमध्ये ट्रम्पची उडवली खिल्ली; म्हटले यांना फक्त जगाचे तुकडेच…

भारत जगातील नंबर १ अर्थव्यवस्था बनणार? दावोसमध्ये अमेरिकन अब्जावधीशाच्या दाव्याने ट्रम्पची उडाली झोप
2

भारत जगातील नंबर १ अर्थव्यवस्था बनणार? दावोसमध्ये अमेरिकन अब्जावधीशाच्या दाव्याने ट्रम्पची उडाली झोप

ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?
3

ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?

रशियाची मोठी खेळी! गाझा ‘Board Of Peace’ साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण…; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट
4

रशियाची मोठी खेळी! गाझा ‘Board Of Peace’ साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण…; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.