अबू धाबीत दोन दिवस चाललेल्या या उच्चस्तरीय बैठकी रशिया युक्रेन युद्धबंदीवर कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे युद्धबंदीबाबात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह वीटकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील शांतता चर्चा बऱ्यापैकी यशस्वी झालेली आहे. परंतु दोन्ही देशात क्षेत्रीय मुद्यावरुन वाद अद्यापही सुटलेला नाही.
काय आहे क्षेत्रीय वाद?
रशियाने युक्रेनच्या डोनबास डोनेत्सकचा २० टक्के भागाचा मागणी केली आहे. पणे युक्रेनने हा भाग कोणत्याही परिस्थितीत रशियाला सोपवण्यास नकार दिला आहे. यामुळे शांतता चर्चेत मोठा अडथळा निर्माण होत आहे. हा केवळ भूभागाचा नाही तर युक्रेनच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी म्हटले आहे.
आणखी एक दुसरा मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एकीकडे शांतता चर्चा सुरु असताना रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच होते. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या उर्जा आणि पायाभूत सुविधां कोलमडून पडली आहे. यामुळे युक्रेनच्या अनेक भागंमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळे लोकांना कडाक्याची थंडी रहावे लागत आहे.
दरम्यान स्टीव्ह वीटकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही देशांतील शांतता चर्चेत पूर्णपणे निर्णय झाला नाही. परंतु दोन्ही देशांनी चर्चेचे दरवाजे बंदीही केलेले नाहीत. दोन्ही देशांतील क्षेत्रीय वाद सुटल्यास नक्कीच शांतता प्रस्थापित होईल. पुढील आठवड्यात रविवारी पुन्हा एकदा स्टीव्ही वीटकॉफ यांच्या उपस्थिती दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत नक्कीच योग्य तो निकाल लागेल असे म्हटले जात आहे. तसेच रशिया आणि युक्रेनने देखील युद्धबंदीसाठी ठोस आणि आवश्यक ती पावले उचलू असे म्हटले आहे.
Ukraine चा गेम ओव्हर? एका रात्रीत रशियाने डागले २९३ ड्रोन्स, घातक बॅलेस्टिक मिसाईल्सनेही केला हल्ला
Ans: रशिया युक्रेनच्या अबू धाबीतील शांतता चर्चेत कोणताही ठोस निकाल लागलेला नाही, दोन्ही देशांतील युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे.
Ans: रशिया युक्रेनमध्ये डोनबासच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. रशियाने या प्रदेशाचा २० टक्के भागाची मागणी केली आहे, परंतु युक्रेनने हा भाग रशियाला देण्यास नकार दिला आहे.






