Russia Ukraine War : इराण युद्धाआड रशियन युक्रेनमध्ये कहर; ड्रोन हल्ल्यात 2 वर्षाच्या चिमुकल्यासह तीन जणांचा बळी (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात ओडेसा शहरातील एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले होते. रशियाने जोरदार ड्रोन हल्ले केल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून रात्रभर त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरुच होते. यामध्ये चार व्यक्तींना सुखरुप वाचवण्यात आले आहे. परंतु या हल्ल्यात २ वर्षाच्या चिमुकलीचा आणि दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी यावर दुख व्यक्त केले आहे.
झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर या हल्ल्यांची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन ड्रोन हल्ल्यात ११ लोक गभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यामध्ये गर्भवती महिला, लहान मुलांचाही सामवेश आहे. आतापर्यंत युद्ध सुरु झाल्यापासून युक्रेनमध्ये १५,००० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
ओडेसा शहरावरील हल्ल्याचा बदला म्हणून युक्रेनने देखील रशियाच्या नोव्होरोसिस्क बंदराला लक्ष्य केले आहे. युक्रेनने आपल्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनने रशियाच्या तेल निर्यातीचा कणा मानल्या जाणाऱ्या बंदरावर हल्ला केला आहे. परंतु यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यांच्या सैन्याने युक्रेनचे ५० ड्रोन हवेतच पाडल्याचा दावा केला आहे. परंतु एक ड्रोन हल्ल्यात आठ लोक जखमी झआले आहे.
सध्या रशियन सैन्याने इराण युद्धाचा फायदा घेत युक्रेनच्या एकूण भूभागापैकी २० टक्के प्रदेशावर ताबा मिळवला आहे. नव्या शांतता चर्चेस रशियाने सहमती दिली आहे. परंतु इराण युद्धामुळे ही चर्चा लांबल्याने इकडे युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस हिंसक होत चालले आहे.
Ans: सोमवारी (०६ एप्रिल २०२६) रशियाने युक्रेनच्या ओडेसा बंदर शहरावर भीषण हल्ला केला आहे.
Ans: रशियाने केलेल्या हल्ल्यात ओडेसा शहरातील एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले असून यामध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Ans: ओडेसा शहरावरील हल्ल्याचा बदला म्हणून युक्रेनने देखील रशियाच्या नोव्होरोसिस्क बंदराला लक्ष्य केले आहे. युक्रेनने आपल्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनने रशियाच्या तेल निर्यातीचा कणा मानल्या जाणाऱ्या बंदरावर हल्ला केला आहे.






