Russia avenges Ukraine's drone attack, ballistic missiles and drones on Ukrainian cities kills four
कीव: अखेर रशियाने युक्रेनच्या ड्रोन हलल्याचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे. रशियाने गुरुवारी मध्यरात्री युक्रेनवर ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. युक्रेनची राजधानी कीव, तसेच आणखी प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडर बेव’ अंतर्गत हा हल्ला करण्यात आला आहे.
युक्रेनने ऑपरेशन स्पायडर वेब राबवत रशियाच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केला होता. यामध्ये रशियाचे मोठे नुकसान झाले होते. रशियाच्या बॉम्ब ताफ्याचा मोठा भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला होता. या हल्ल्यानंतर रशियामध्ये संताप उमटला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनही तीव्र संतापले होते. त्यांनी युक्रेनच्या हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल असे म्हटले होते. यानंतर रशिया युक्रेनवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचेही समोर आले होते.
या हल्ल्याच्या एकदिवस आधी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधताना व्लादिमिर पुतिन यांनी रशियन हवाई तळांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाश्न दिले होते. तथापि पुतिन यांनी आपले आक्रमक वचन सिद्ध करुन दाखवले.
रशियन सैन्याने युक्रेनियन प्रदेशांमध्ये हवाई हल्ला सुरु केला आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे Tu-95 बॉम्बर्स युक्रेनच्या प्रदेशावर उड्डाण करत बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करत आहे. कीव, टेर्नोपिल, खमेलनित्सिकी ओबाल्ट, ल्विव्ह आणि लुत्सक येथे मोठे हल्ले केले आहेत.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक ठिकाणी भीषण स्फोट झाले असल्याची माहिती कीव प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेन्का यांनी दिली. त्यांनी म्हटले की, आमच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु यामध्ये त्यांना अपयश आले. यामुळे अनेक भागांमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. सोलोमिन्स्की, होलोसिव्हस्की, डार्नित्स्की, निप्रोवस्की आणि शेंचेकेविस्की यासाह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज येत आहे.
कीवचे महापैर विटाली क्लित्स्को यंनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात चार जमांचा मृत्यू झाला आहे. तसेच २० जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विचाली क्लित्स्को यांनी म्हटले ” नागरिकांनी एकमेकांचे रक्षण करावे, आपल्या हवाई संरक्षण यंत्रणा शक्य ती मदत करतील. सर्वांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
युक्रेनच्या अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसानीची नोंद झाली आहे. सर्व ठिकाणी बचाव पथक पोहोचले असून मदत कार्यात गुंतलेले आहेच. युक्रेनच्या उत्तरी भागातही हल्ले सुरु केले आहेत. उत्तर चेर्निहिव्ह प्रदेशात एका इमारतीजवळ मोठा स्फोट झाला आहे. शहराच्या बाहेरील भागातही हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे.
Russia Ukraine War: ‘शाहिद’ ठरतोय युक्रेनसाठी कर्दनकाळ! रशियाच्या भयानक हल्ल्याने जग देखील भेदरले