(फोटो - ZelenskyyUa/ट्विटर)
Russia vs Ukraine: गेलया अनेक वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण स्वरूपाचे युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध हे दिवसेंदिवस अत्यंत तीव्र आणि भयानक होत चालले आहे. नुकताच रशियाने युक्रेनवर भीषण हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनच्या उत्तर भागातील प्रिलुकी शहराला लक्ष्य केले. यामध्ये युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे.
रशियाने युक्रेनच्या उत्तरी भागाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात युक्रेनमधील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रादेशिक गव्हर्नर व्याचेस्लाव चाउस यांनी दिलेल्या महितनुसार, गुरुवारी सकाळी रशियाच्या शाहिद ड्रोनने युक्रेनच्या प्रिलुकी भागात भीषण हल्ले केले. सहा शाहिद ड्रोनने युक्रेनवर हल्ला केला. ज्यामुळे अनेक रहिवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर क्षेत्रीय प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन शहर खार्किवमध्ये रशियाच्या हल्ल्यात 17 नागरिक जखमी झाले. ज्यामध्ये एका लहान मुलासह एका गरोदर महिलेचा आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे.
Last night, Russia struck Pryluky in the Chernihiv region with six attack drones. A rescue operation continued throughout the night. Unfortunately, there have been injuries and fatalities. One of the rescuers arrived to deal with the aftermath right at his own home — it turned… pic.twitter.com/5B0WhRwenr
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 5, 2025
रशियाच्या ड्रोनने युक्रेनच्या रहिवाशी भागांना लक्ष्य केले. शाहिद ड्रोनने हे हल्ले केले. यामध्ये अनेक गाड्या जाळून खाक झाल्या आहेत. युक्रेनवर रशियाने आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. त्यामुळे हा संघर्ष अधिक तपण्याची शक्यता आहे. रशियाच्या एअरबेसवर झालेल्या हल्ल्याना आम्ही जशास तसे उतर देऊ असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.
युक्रेनचा विनाश अटळ!
जेव्हा युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केला तेव्हा पुतिनच त्याला प्रत्युत्तर देणार हे निश्चित झाले होते. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते त्याला प्रत्युत्तर देणार आहेत. ट्रम्प यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी सुमारे एक तास १५ मिनिटे फोनवर चर्चा केली. त्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु पुतिन सहमत होण्यास तयार नाहीत. त्यांनी स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे की एअरबेसवरील हल्ल्याला दिले जाणारे प्रत्युत्तर इतके जोरदार असेल संपूर्ण जग ते पाहत राहील. पुतिन यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले की रशियामध्ये युक्रेनचे हल्ले आता असह्य आहेत. दोन्ही नेत्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरही चर्चा केली, परंतु युक्रेनचा मुद्दा वर्चस्व गाजवत होता.