Russia occupies another area of Ukraine
कीव: एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरु आहेत, तर दुसरीकडे रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. शनिवारी (15 फेब्रुवारी) दावा केला आहे की, त्यांनी युक्रेनच्या डोनेट्स्क क्षेत्रातील एका लहान गावावर कब्जा केला आहे. मात्र, युक्रेनकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. यापूर्वी रशियाने चर्नोबिल न्यूक्लियर प्लांटवर ड्रोन हल्ला केला होता. यामुळे संघर्षविराम होतो की नाही यावर तज्ज्ञांनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
लवकरच युद्धाला तीन वर्षी पूर्ण होतील
रशिया हळहळू युक्रेनच्या कमतुवत भागांवर हल्ले करत आहे. यामुळे युक्रेनला आपली जमीन गमावीव लागत आहे. गेल्या तीन वर्षीपासून सुरु असलेल्या या युद्धाला लवकरच तीन वर्ष पूर्ण होती. मात्र, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न कमी पडत असल्याचे म्हटले जात आहे.
रशियाचा डोनेस्ट्क भागात दबदबा
रशियाने सध्या युक्रेनच्या डोनेट्स्क क्षेत्रातील बेरेझिव्का गाव ताब्यात घेतले आहे. यामुळे रशियाचा या भागातील दबदबा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रशिया डोनेट्स्क आणि लगतच्या लुहान्स्क भागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून हे दोन्ही भाग मिळून युक्रेनच्या डोनबास औद्योगिक क्षेत्राचा भाग बनतात.
तीव्र हल्ले
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम रशियात शनिवारी रात्रीपर्यंत 40 युक्रेनी ड्रोन पाडण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, मॉस्कोकडून 70 ड्रोन हल्ले करण्यात आले, पण युक्रेनच्या वायूसेनेने 33 ड्रोन नष्ट केले आणि 37 ड्रोन बेपत्ता झाले आहेत.
संघर्ष अजूनही कायम
युद्धविरामाबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोऱ निर्णय घेण्यात आलेला नाही. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या या युद्धाचा मोठा फटका दोन्ही देशांना बसला आहे युद्धभूमीवर अजूनही संघर्षाची स्थिती कायम आहे. दोन्ही देशांनी युद्धविरामाबाबत चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे.
मात्र, रशियाच्या या हल्ल्यावरुन रशियाला युद्ध संपवायचे नसल्याचे स्पष्ट दिसून येते. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांशी संवाद साधून युद्धविरामासाठी प्रयत्न केले आहेत. या चर्चेत दोन्ही देशांनी युद्धात होणाऱ्या जीवित हानीला थांबवण्याची गरज असल्याचे मान्य केले आहे, मात्र रशियाच्या या हल्ल्यांमुळे पुतिन यांच्या मनात नेमकं का चाललं आहे हे सांगणे कठीण होत आहे.