Europol Most Wanted: मेक्सिकोत गॅंगवॉरदरम्यान युरोपच्या मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज तस्कराची हत्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मेक्सिको सिटी: युरोपच्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेरागांपैकी ड्रग्ज तस्कराची मार्को एबेनची मेक्सिकोत हत्या करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी (14 फेब्रुवारी) या घटनेची पुष्टी केली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (11 फेब्रुवारी) राजधानी मेक्सिको सिटीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या एटिजापन डी जारागज गावात एबेनवर गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आले.
मरण्याचे नाटक
मार्को एबेन हा 32 वर्षांचा असून यापूर्वीही सजा टाळण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले होते. मात्र, त्यावेळी पोलिसांना त्याच्या मृत्यूचे कोणतेही पुरावे हाती लागले नव्हते. केवळ त्याच्या एका प्रेयसीने त्याचा मृतदेह पाहिल्याचा दावा केला होता. यावेळी मात्र, अधिकाऱ्यांनी एबेनच्या मृत्यूची आणि ओळखीची खात्री केली आहे.
Convicted Dutch drug kingpin Marco Ebben, once considered one of Europe’s most wanted criminals, has been killed in a gun battle in Mexico ⤵️ https://t.co/FRgxiJDyB8
— Al Jazeera English (@AJEnglish) February 15, 2025
सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा
युरोपच्या कायदा अंमलबजावणी संस्था युरोपोलने मार्को एबेनला मोस्ट वॉन्टेड क्रिमिनलच्या यादीत समाविष्ट केले होते. एबेनवर ब्राझीलहून ते नेदरलँड्सपर्यंत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करी केल्याचे आरोप होते. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही सजा आणि अटक टाळण्यासाठी, एबेनने सिनालाओ कार्टेलच्या दोन गटांमधील संघर्षाचा फायदा घेत स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले होते.
कोकेनच्या तस्करीचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, 2014 ते 2015 दरम्यान, मार्को एबेन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे 400 किलोग्रॅम कोकेनची तस्करी केली होती. या मोठ्या प्रमाणातील ड्रग तस्करीसाठी अननसांनी भरलेल्या ट्रकचा वापर करण्यात आला होता. सिनालाओ कार्टेलमधील सत्ता संघर्षामध्ये मार्को एबेन सहभागी होता.
प्रकरणाचा तपास सुरु
गेल्या वर्षी जुलैमध्ये सिनालाओ कार्टेलचे सह-संस्थापक इस्माईल एल मेयो जाम्बाडा यांना अमेरिकेत अटक झाल्यापासून या कार्टेलमधील गटांमध्ये संघर्ष उफाळून आला. या संघर्षात मार्को एबेन एका गटाशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. एबेनच्या मृत्यूसह, सिनालाओ कार्टेलमधील अंतर्गत संघर्ष अजूनही सुरू असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. मार्को एबेनच्या हत्येनंतर मेक्सिको आणि युरोपमधील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.