Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान रशियाची मोठी चाल! युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, शांतता चर्चेला तडा?

Russia Ukraine War : रशियाने मध्यपूर्वेतील तणावाचा फायदा घेत युक्रेनवर तीव्र हल्ला चढवला आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याने युक्रेनमध्ये घबराट पसरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 08:59 AM
Russia Launches Massive Missile And Drone Attack On Kyiv

Russia Launches Massive Missile And Drone Attack On Kyiv

Follow Us
Follow Us:
  • इराणयुद्धादरम्यान रशिया-युक्रेन संघर्ष पुन्हा पेटला
  • रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन अन् मिसाइल हल्ला
  • चार नागरिकांचा बळी
Russia Attack on Ukraine News in Marathi : मॉस्को/कीव्ह : एकीकडे मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. या संघर्षादरम्यान रशिया युक्रेन युद्धा(Russia Ukraine War) ला चार वर्षे पूर्ण झाली असून पुतिन यांच्या सैन्याने युक्रेनवर आतापर्यंतच भीषण हल्ला केला आहे. मध्यपूर्वेतील अशांततेचा फायदा घेत रशियाने आपली संपूर्ण ताकद युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरली आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला केला आहे. यामध्ये ४ निरापराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी आहेत.

US-Iran War : अमेरिका-इस्रायलच्या डोळ्यांत फेकली धूळ! इराणने हिंद महासागरातून नौसैनिकांना ‘असं’ उडवून नेलं, भारताची गुप्त मदत?

एका रात्रीत शेकडो ड्रोन्सचा मारा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने एका रात्रीत तब्बल ४३० ड्रोन्स आणि ६८ क्षेपणास्त्रे कीव्ह डागली आहे. कीव्हीमधील चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये भीषण स्फोट झाला असून लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. संपूर्ण शहरात इमारती कोसळून ढिगारे आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.

जनजीवन विस्कळीत

रशियाने या हल्ल्यात नागरी वस्ती आणि वीज प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. यामुळे लाखो लोक थंडीत वीज आणि पाण्याविना तडफडत आहेत. अनेक शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठांवर क्षेपणास्त्रे कोसळ्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. युक्रेनच्या सुमी शहरतील एका रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत अनेक लोकांची घरे जळून खाक झाली आहेत.

शांतता चर्चेला मोठा तडा

विशेष म्हणजे हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये शांततात चर्चा सुरु होती. इराण युद्धामुळे ही चर्चा थांबवण्यात आली होती. मात्र रशियाच्या या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. झेलेन्स्की यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना शांतता नको असून युक्रेनला उद्ध्वस्त करायचे आहे, असा आरोप केला आहे.

मानवी संकट आणि जागतिक चिंता

गेल्या चार वर्षांपासून हे युद्ध सुरु असून यामध्ये युक्रेनचा मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील अनेक शहरे आता ढिगाऱ्यांमध्ये उरली आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिक संघटनांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परंतु सध्या मध्यपूर्वेतील स्थिती पाहता रशिया युक्रेन शांतता चर्चा थांबल्याने युद्धविरामाची चिन्हे धूसर झाली आहेत. याशिवाय अमेरिकेने इराणच्या मिसाइल्सला रोखण्यासाठी आपले पॅट्रियट इंटरसेप्टर मिसाइल मध्यपूर्वेकडे वळवले आहे. यामुळे युक्रेनची लष्करी मदत मंदावली आहे. यामुळे युक्रेनच्या संरक्षणाला धोका निर्माण होत आहे. याचा फायदा रशिया घेत आहे.

US-Iran War : इराणवर हल्ला अन् रशियाची चांदी! पुतिन यांच्या तिजोरीत पडणार अब्जावधींचा पाऊस?

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने युक्रेनमध्ये पुन्हा काय केले?

    Ans: रशियाने मध्यपूर्वेतील तणावाकडे जगाचे लक्ष्य लागले असातानच युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला चढवला आहे.

  • Que: रशियाने कीव्हवरील हल्ल्यात किती ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे?

    Ans: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाने एका रात्रीत सुमारे 430 ड्रोन आणि 68 मिसाइल डागल्या आहेत.

  • Que: रशियाच्या कीव्हवरील हल्ल्यात किती जीवितहानी झाली?

    Ans: रशियाच्या कीव्हवरील हल्ल्यात ४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Russia ukraine war russia launches biggest attack amid middle east tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी
1

Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी

Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस
2

Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का
3

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?
4

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.