Russia Ukraine War : Russia's ‘Massive attack on Ukraine's Kyiv at least 10 killed
कीव : सध्या जग दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. एकीकडे मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल आणि दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. सध्या मध्य पूर्वेत अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर तीव्र संघर्ष उफाळला आहे. इराणने देखील प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच दुसरीकडे रशियाने युक्रेनमध्ये कहर माजवला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखणी झाले आहे. अशी माहिती कीवच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. रशियाने कीवमधील एका रहिवासी इमारतीला लक्ष केले आहे. यामुळे संपूर्ण इमारतीचे ढासळल्या आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकेलेल्या लोकांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. कीवच्या नैऋतेस बिला त्सेरक्का शहरातही रशियाने हल्ला केला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू आणि आठ जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या एक आठवड्यापूर्वी देखील रशियाने युक्रनेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात कीवमधील २८ जणांचा मृत्यू झाला होता. रशियाने कीवमधील रहिवासी इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे युद्धातील सर्वात मोठ्या बॉम्बस्फोटांपैक एक म्हणून केले होते.
तसेच सोमवारी (२३ जून) पहाटे देखील कीवमदील रहिवासी इमारती, रुग्णालये आणि क्रीय संकुलांन लक्ष्य करण्यात आले. सर्वात जास्त नुकसान शेवचेनकिव्स्की शहरात झाले असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कीवचे महापौर विटाली क्लित्स्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवचेनकिव्स्कि प्रदेशात रशियाच्या हल्ल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने एका रहिवासी इमारतीवर हल्ला केला होता. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने रात्रभर एकूण ३५२ स्फोटक ड्रोन आणि डेकॉय सोडले. तसेच ११ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि पाच क्रूझ क्षेपणास्त्रांचा देखील हल्ला केला आहे.
सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. याच वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी इराणला मध्यस्थीची ऑफर दिली आहे. तसेच युद्ध हा शांततेचा मार्ग नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु दुसरीकडे रशियन सैन्यच युक्रेनवर तीव्र हल्ले करत आहे.