कॅनडात पदवी समारंभात भारतीय विद्यार्थ्याचा 'शंकर भगवान की जय' चा नारा; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर दररोज काही ना काही वेगळं पाहायला मिळतात. कधी मनोरंजक, तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. केवळ आपल्या आसपासच्या परिसरातील किंवा आपल्या देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगात सध्याच्या घडीला काय सुरु आहे हे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कॅनडातील आहे. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांने पदवीदान समारंभात असे काही केलं आहे की सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडात एका पदवीदान समारंभात दिल्लीतील एका भारतीय विद्यार्थ्याने शंकर भगवान की जय असा नारा दिला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामुदायिक उत्सवाचा एक दुर्मिळ क्षण असे याचे वर्णन केले जात आहे. राहूल छिल्लार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याने सास्काचेवान पॉलिटेक्निकमधून पदवी प्राप्त केली आहे. या विद्यार्थ्यानं संमारंभारच्या वेळी शंकर भगवान की जय असा नारा दिला आहे. अभिमानेने त्याने भगवान शंकराचा जयघोष केला आहे.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पदवीदान समारंभ सुरु आहे. यावेळी दिल्लीतील या राहूल छिल्लारचे नाव घेतले जाते. राहूल स्टेजवर येतो. यावेळी आपल्या ग्रॅज्युएशन स्पीचच्या वेळी तो शंकर भगवान की जय असा जयघोष करतो. त्यानंतर पदवी देण्याऱ्याशी हातमिळवणी करतो आणि आपली पदवी घेतो. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @log.kya.kahenge या अकाउंटवर शेअर करण्याक आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “अल्लाह हू अकबर बोलला असता तर गोंधळ उडाला असता” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने, “भाऊ, भारत माता की जय बोलाला असता तर चांगले झाले असते” असे म्हटले आहे, तर आणखी एकाने “अंधभक्ताला माहित होते तो प्रसिद्ध होईल, प्रसिद्ध होणे की निंजा टेक्निक” असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.