Russia-Ukraine War Ukraine kills 1030 russian soldiers amid trump putin peace talk
कीव: गेल्या तीन वर्षापासून रशिया-युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी सोमवारी (१९ मे) दोन तास चर्चा केली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी लवकरच युद्धबंदी होईल असा दावा केला आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्यात सुमारे दोन तास ही चर्चा झाली. या दरम्यान पुतिन यांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. मात्र एककीडे ट्रम्प पुतिन यांच्याशी चर्चा करत असताना युक्रेनने रशियन सैन्यावर हल्ला चढवला. यामध्ये हजारो रशियन सैनिकांना ठार करण्यात आले. यामुळे युद्धबंदी होणार की संघर्ष आणखी चिघळणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
युक्रेनच्या सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रशियाच्या जवळपास हजारहून अधिक सैनिकांना एकाच दिवसांत ठार केले आहे. एकीकडे ट्रम्प युद्धबंदीसाठी राजनैतिक पातळीवर च्राच करत आहेत, तर दुसरीकडे युक्रेनच्या या कृतीने युद्धआमकी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी (१९ मे) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. ही चर्चा तब्बल दोन तास सुरु होती. मीडिया रिपोर्टनुसार, पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरत्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. यामध्ये युक्रेनसोबत शांतता कराराच्या अटींवर चर्चा करण्यात आली आणि एक मसुदा तयार करण्यात आला. यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली.
मात्र एककीडे ट्रम्प पुतिन यांच्याशी चर्चा करत असताना युक्रेनने रशियन सैन्यावर हल्ला चढवला. यामध्ये एका दिवसात १०३० रशियन सैनिकांना ठार करण्यात आले. तसेच युक्रेनने केलेल्या हल्ल्यात ५ आर्मर्ड व्हेईकल्स, रशियन टॅंक, १०५ लष्करी वाहने ५८ तोफा, ११८ यूएव्ही ड्रोन अशी महत्त्वाची आणि ताकदवर लष्करी संसाधने नष्ट केली ाहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यावर केवळ ३० दिवसांत युक्रेन-रशियावर युद्धबंदी करणार असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापर ट्रम्प यांना युद्धबंदी करण्यात यश आलेले नाही. सोमवारी झालेल्या चर्चेत युद्धबंदीवर पुतिन यांनी सहमती दर्शवली असली, तरी दुसरीकडे युक्रेनने रशियन सैनिकांना ठार केले आहे. यामुळे युद्धात आणखी एक ठिणगी पडली असून युद्ध चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे तीन वर्षापासून सुरु असलेल्या युद्ध संपुष्टात येणार का आणि कधी असा प्रश्न तसाच आहे.