Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Pipeline Shutdown : 90 मिनिटांत खेळ खल्लास! सौदीने केली मुख्य तेल पाइपलाइन बंद; आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड 107 डॉलर पार

Saudi Pipeline Shutdown : ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाची पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइन बंद झाल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भारतावरही परिणाम होऊ शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 15, 2026 | 12:29 PM
Saudi Arabia Oil Pipeline Shutdown Crude Oil Price Today

Saudi Arabia Oil Pipeline Shutdown Crude Oil Price Today

Follow Us
Follow Us:
  • जागतिक ऊर्जा संकट
  • कच्च्या तेलाचे दर $१०७ पार
  • भारतावर थेट परिणाम

मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षाची झळ आता संपूर्ण जगाच्या ऊर्जा क्षेत्राला बसू लागली आहे. इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आधीच बंदप्राय स्थितीत असताना, आता सौदी अरेबियाच्या पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइनवर (East-West Crude Oil Pipeline) झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यामुळे ही पाइपलाइन तात्पुरती बंद करावी लागली आहे. होर्मुझच्या जलमार्गाला एकमेव मुख्य पर्याय असलेली ही १,२०० किलोमीटरची पाइपलाइन बंद पडल्याने जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. (Saudi Pipeline Shutdown)

ही पूर्व-पश्चिम पाइपलाइन अरबी द्वीपकल्पातून जाऊन लाल समुद्राजवळील ‘यान्बू’ बंदरापर्यंत दररोज सुमारे ४ ते ५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल वाहून नेते. हे प्रमाण जगाच्या एकूण दररोजच्या तेल पुरवठ्याच्या तब्बल ४ ते ५ टक्के इतके आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक थांबलेली असताना सौदी अरेबिया याच मार्गाने आपली निर्यात सुरळीत ठेवत होता. मात्र, इराकमधील इराणसमर्थित गटांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाइपलाइनच्या पंपिंग स्टेशनचे मोठे नुकसान झाले असून, ही यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यान्बू बंदरातील साठा आणि सौदीचे घटलेले उत्पादन

पाइपलाइन बंद झाल्यामुळे सौदी अरेबियाच्या यान्बू बंदरातील राखीव तेल साठ्यावर प्रचंड ताण आला आहे. अहवालानुसार, या बंदरात उपलब्ध असलेला साठा केवळ ५ ते ७ दिवसच निर्यातीसाठी पुरेल असा अंदाज आहे. जरी सौदी अरेबिया इजिप्तमधील आपल्या अतिरिक्त साठ्यातून तात्पुरती सोय करत असला, तरी दीर्घकालीन पुरवठा रोखणे या साठ्याला शक्य होणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा

विशेष म्हणजे, हे संकट अशा वेळी आले आहे जेव्हा सौदी अरेबियाने आधीच आपले तेल उत्पादन कमालीचे घटवले आहे. ऑगस्ट महिन्यात सौदीचे रोजचे उत्पादन ६.२ दशलक्ष बॅरलवर आले होते, जे फेब्रुवारी महिन्यातील १०.९ दशलक्ष बॅरलच्या तुलनेत खूपच कमी आहे. उत्पादनातील घट आणि मुख्य निर्यातीचा मार्ग बंद झाल्यामुळे ओपेक (OPEC+) देशांवर तेल पुरवठा वाढवण्याचा प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी

सौदीची पाइपलाइन बंद पडल्याची बातमी बाहेर येताच जागतिक शेअर बाजार आणि ऊर्जा बाजारात मोठे पडसाद उमटले. आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूडची (Brent Crude) किंमत प्रति बॅरल १०७.८१ डॉलरवर पोहोचली, तर अमेरिकन डब्ल्यूटीआय (US WTI) क्रूडची किंमत १०२.९४ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. जर होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रातील जहाजांची वाहतूक अशीच ठप्प राहिली, तर येत्या काही दिवसांत कच्चे तेल १२० ते १२५ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकते असा इशारा ऊर्जा तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकांच्या खिशावर काय परिणाम होणार?

भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास ८५% पेक्षा जास्त कच्चे तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव १ डॉलरने जरी वाढला, तरी भारताचे आयात बिल हजारो कोटी रुपयांनी वाढते.

जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०५ ते ११० डॉलरच्या वर दीर्घकाळ राहिले, तर भारतीय तेल कंपन्यांवर (IOCL, BPCL, HPCL) इंधनाचे दर वाढवण्याचा प्रचंड दबाव येईल.

  1. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती: देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ५ ते ८ रुपयांची वाढ होऊ शकते.
  2. वाहतूक आणि महागाई: डिझेल महागल्यास मालवाहतूक महाग होईल, ज्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या दरांवर होऊन महागाई वाढेल.
  3. विमान प्रवास महागणार: एअरलाईन कंपन्यांसाठी विमान इंधन (ATF) महागल्याने हवाई प्रवासाचे तिकीट दर वाढतील.
  4. रुपया घसरणार: भारताचे आयात बिल वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी कमकुवत होऊ शकतो.

Web Title: Saudi arabia oil pipeline shutdown impact on petrol diesel prices in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • crude oil
  • Diesel Petrol Price
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
1

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा
2

AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न
3

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न

UK Breakup: ब्रिटनच्या विघटनाची नांदी? स्कॉटलंड, वेल्स अन् उत्तर आयर्लंड स्वातंत्र्यासाठी एकत्र; ट्रम्पच्या विधानाने ओतले आगीत तेल
4

UK Breakup: ब्रिटनच्या विघटनाची नांदी? स्कॉटलंड, वेल्स अन् उत्तर आयर्लंड स्वातंत्र्यासाठी एकत्र; ट्रम्पच्या विधानाने ओतले आगीत तेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.