
singapore ambassador bilahari kausikan slams pakistan nuclear weapons benazir bhutto story july 2026 economy
Bilahari Kausikan slams Pakistan nuclear weapons : आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळातून पाकिस्तानसाठी एक अत्यंत मानहानीकारक आणि डोळे उघडवणारी बातमी समोर आली आहे. सिंगापूरचे (Singapore) माजी परराष्ट्र सचिव आणि ख्यातनाम राजदूत बिलहरी कौसिकन (Bilahari Kausikan) यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर आणि त्यांच्या राजकीय व्यवस्थेवर अत्यंत टोकदार शब्दांत प्रहार केला आहे. कौसिकन यांच्या या विधानांमुळे इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. “पाकिस्तान हा एक असा देश आहे, जो सातत्याने केवळ स्वतःच्या चुकांमुळे अपयशाच्या उंबरठ्यावर उभा असतो,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी पाकिस्तानची लायकी जगासमोर मांडली.
बिलहरी कौसिकन यांनी पाकिस्तानच्या आजवरच्या सर्वात मोठ्या अहंकारावर म्हणजेच त्यांच्या ‘अणुबॉस्त्रांवर’ (Nuclear Weapons) थेट हल्ला चढवला. ते म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुशस्त्रे आहेत, केवळ याच एका कारणास्तव संपूर्ण जग त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करते किंवा त्यांच्याशी संवाद ठेवते. जर दुर्दैवाने पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश नसता, तर आज जगातील एकाही देशाला त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्या अंतर्गत वादांची किंवा त्यांच्या संपूर्ण विनाशाची साधी पर्वा ही वाटली नसती. पाकिस्तानने स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा प्रगतीवर जगात कधीच स्थान मिळवले नाही, तर केवळ अणुबॉम्बच्या धाकावर तो जगाच्या नकाशावर आपले अस्तित्व टिकवून आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : General Vahidi: कर्बलाच्या पवित्र लाल ध्वजाने झाकली अली खामेनींची शवपेटी; इराणच्या लष्करी शक्तीचा ‘हा’ बलाढ्य चेहरा पुन्हा सक्रिय
सध्याच्या आंतरराष्ट्रीय समीकरणांचा संदर्भ देत कौसिकन यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवले. अलीकडच्या काळात अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तीव्र लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान जागतिक स्तरावर स्वतःला ‘शांततादूत’ किंवा मध्यस्थ म्हणून सादर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. यावर कडक शब्दांत आक्षेप घेत माजी राजदूत म्हणाले की, अशा आंतरराष्ट्रीय मंचांवरून राजनैतिक यश मिळवणे किंवा मोठी विधाने करणे कागदावर नक्कीच चांगले वाटते; पण यामुळे पाकिस्तानच्या भुकेल्या जनतेचे पोट भरत नाही.
पाकिस्तानची खरी समस्या कोणतीही भौगोलिक रचना किंवा बाह्य देश नसून, त्यांचे अंतर्गत गैरव्यवस्थापन हीच आहे. देशातील जिहादी आणि दहशतवादी गटांना दिलेली अनियंत्रित सुट, लष्कराचा राजकारणातील अतिरेकी हस्तक्षेप आणि अर्थव्यवस्थेचे केलेले पद्धतशीर वाटोळे यामुळेच आज पाकिस्तान या अत्यंत दयनीय आणि भिकारी अवस्थेत येऊन पोहोचला आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली.
Pakistani Journalist: PAK’s problems come from its borders with India, Afghanistan etc Ex-Singapore Ambassador: That is an excuse. Pakistan has been mismanaged from the beginning. I don’t see any solution. Your politicians are a waste of time. The military is part of the problem pic.twitter.com/RlYnRBObzT — Shashank Mattoo (@MattooShashank) July 3, 2026
credit – social media and Twitter
परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने नेहमीप्रमाणे रडगाणे गात देशाच्या या दुर्दशेसाठी भारत, अफगाणिस्तान आणि इराणच्या भौगोलिक रचनेला (Geographical Location) दोष देण्याचा प्रयत्न केला. कौसिकन यांनी हा युक्तिवाद जागीच खोडून काढला. ते म्हणाले की, स्वतःच्या अपयशासाठी शेजारी देशांना किंवा भूगोलाला दोष देणे हे निव्वळ पळपुटेपणाचे लक्षण आणि एक सोयीस्कर निमित्त आहे.
आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी १९९१ मधील सिंगापूर एअरलाइन्सच्या (Singapore Airlines) विमान अपहरणाची एक ऐतिहासिक आणि रंजक आठवण सांगितली. त्या संकटाच्या काळात जेव्हा सिंगापूर प्रशासनाने तात्कालिक मदतीसाठी पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भुट्टो यांच्या घरच्या नोकराने अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर दिले होते की, “मॅडम आता झोपल्या आहेत, त्यांना अजिबात त्रास देता येणार नाही!” आणि एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला होता. हा किस्सा सांगत कौसिकन यांनी दाखवून दिले की, संकट काळातही पाकिस्तानी नेतृत्वाची पातळी किती गंभीर आणि बेजबाबदार राहिलेली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran vs USA: ‘होर्मुझ सामुद्रधुनी आमची लक्ष्मणरेषा, हस्तक्षेप केलात तर…’; बहरीनमधील 12 देशांच्या बैठकीनंतर इराण अमेरिकेवर भडकला
सिंगापूरच्या माजी राजदूतांनी केलेली ही विधाने पाकिस्तानच्या जुलै २०२६ मधील अत्यंत भीषण आर्थिक आकडेवारीवर शिक्कामोर्तब करतात. सध्या पाकिस्तानमधील महागाईचा दर (Inflation Rate) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा असून तो १२% च्या पार गेला आहे. दुसरीकडे, देशाचा आर्थिक विकास दर (GDP Growth) अवघ्या २.३३% पर्यंत खाली घसरला आहे, जो अत्यंत चिंताजनक आहे.
पाकिस्तानी सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कठोर अटी आणि बेलआउट पॅकेज मिळवण्यासाठी नुकताच ६१ अब्ज डॉलर्सचा एक नवा आणि जाचक अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या बजेटचा संपूर्ण कररूपातील भार तिथली गरीब जनता आणि छोट्या व्यावसायिकांवर टाकण्यात आला आहे. राजकीय अस्थिरतेमुळे परदेशी गुंतवणूकदार सातत्याने आपला निधी पाकिस्तानमधून काढून घेत आहेत. परिणामी, हा देश कर्जाच्या अशा चक्रव्यूहात अडकला आहे, ज्यातून बाहेर पडणे आता त्यांच्यासाठी अशक्य दिसत आहे.