प्लेन हायजॅकच्या प्रेमात पडल्या, भारताशी खास कनेक्शन; कशी आहे सुशील कार्की यांची प्रेमकहाणी?
Sushila Karki Love Story: नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळ आणि जेन-झी आंदोलनामुळे नेपाळमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याबाबत बरीच चर्चा आहे. नेपाळमधील आंदोलनकारी तरुणांनी सुशीला कार्की यांचे नाव सुचवले होते. सुशीला कार्की नेपाळच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशही राहिल्या आहेत. पण याशिवाय एक खास बाब म्हणजे, सुशीला कार्की यांचे भारताशी अगदी जवळचे नाते आहे. कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि तिथेच त्यांची प्रेमकहाणीही सुरू झाली.
१९७३ च्या काळात नेपाळच्या इतिहासात एक महत्त्वाचा घटना घडली होती. त्यावेळी देशात लोकशाही पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न जोरात सुरू होते. यासाठी गिरिजा प्रसाद (जीपी) कोईराला सशस्त्र संघर्षाचे नेतृत्व करत होते. त्या काळात त्यांना शस्त्रे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता होती. त्यावेळी, जून १९७३ मध्ये, नेपाळ एअरलाइन्सचे विमान अपहरण झाले. हे विमान विराटनगरहून काठमांडूला जात होते आणि त्यात सुमारे ४० लाख रुपये रोख होते, जे नेपाळच्या सेंट्रल बँकेत पाठवण्यासाठी नेण्यात येत होते.
Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..
पण त्याच वेळी अपहरणकर्त्यांनी विमानाला भारतातील बिहारमधील फोर्ब्सगंज येथे उतरवण्यास भाग पाडले. तेथून रोख रक्कम काढून घेण्यात आली आणि ही रक्कम जीपी कोईराला यांना देण्यात आली असा आरोप आहे. नंतर, ही घटना नेपाळच्या लोकशाही चळवळीसाठी महत्त्वाची मानली गेली, कारण नंतर लोकशाही परत आली आणि कोईराला चार वेळा पंतप्रधान झाले.
नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्या आयुष्याचा प्रवास शिक्षण, न्यायसेवा आणि वैयक्तिक आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांनी परिपूर्ण आहे. विराटनगर येथे जन्मलेल्या कार्की शिक्षणासाठी भारतात गेल्या. १९७५ साली त्यांनी वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्या नेपाळला परतल्या आणि त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत न्यायिक सेवेत प्रवेश केला.
Donald Trump चा G-7 देशांवर दबाव, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-चीनवर अधिक Tariff
त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दुर्गा प्रसाद सुवेदी यांची साथ. एके काळी नेपाळ काँग्रेसशी संबंधित अपहरण प्रकरणात सुवेदींचे नाव आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी शिक्षण आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारला.
मनोरंजक बाब म्हणजे, कार्की आणि सुवेदी यांची भेट बीएचयूच्या काळात झाली. त्या वेळी दुर्गा प्रसाद सुवेदी हे सुशीला कार्की यांच्या शिक्षक होते. ही ओळख पुढे आणखी घट्ट होत गेली आणि दोघांनीही आयुष्यभराची गाठ बांधण्याचा निर्णय़ घेतला. सुशीला कार्की यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “दुर्गा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातही विश्वासू मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने खरे मित्र ठरले.”