छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश
विजापूरमध्ये नक्षलवाद्यांना कंठस्नान
नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई
Chhatisgarh Naxalists Killed: छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात ही कारवाई केली आहे. तेथील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमकीचा थरार झाला. यात 2 नक्षलवादी ठार झाले आहेत.
सुरक्षा दलांनी ही कारवाई विजापूर जिल्ह्याच्या दक्षिणी भागात केली आहे. येथील जंगलाला सुरक्षा दलांनी संपूर्णपणे वेढा घातला आहे. सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. या भागात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणेने वेगाने कारवाई केली आणि 2 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.
नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत 2 नक्षलवादी ठार झाले आहेत. विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार रंगला आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जपत्करण्यात आला आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. या भागात अजून काही नक्षलवादी लपले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराला सुरक्षा दलाने वेढले आहे.
गोळ्यांच्या आवाजांनी थरारले छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाने छत्तीसगडच्या गरियाबंद येथे 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुरक्षा दलाने छत्तीसगडच्या गरियाबंद येथे ही कारवाई केली आहे. गरियाबंद येथे सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन राबवले आहे. या भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. या कारवाईत 1 कोटींचे बक्षीस असणारा टॉप कमांडर देखील ठार झाला आहे.
सुरक्षा दलाने गरियाबंद येथे हे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या पूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. सुरक्षा दले व नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यामध्ये एक कोटींचे बक्षीस असलेला टॉप कमांडर ठार झाला आहे. या भागात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती.
गोळ्यांच्या आवाजांनी थरारले छत्तीसगड; 1 कोटींचे बक्षीस असलेला कमांडर ठार; तर 10 नक्षलवाद्यांना थेट…
गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने नक्षलवादाविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. मोडेम बालकृष्ण या टॉप कमांडरवर एक कोटींचे बक्षीस होते. अखेर त्याला ठार मारण्यात यश आले आहे. या कारवाईत छत्तीसगड पोलिस, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांचा समावेश होता. गरियाबंद हा कायमच नक्षलवाद्यांचा गड राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे.