अमेरिकेला मोठा झटका! स्वित्झर्लंडने फिरवली पाठ; कोट्यवधींचा शस्त्रास्त्र व्यवहार धोक्यात, आता काय करणार ट्रम्प? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
स्वित्झर्लंडच्या फेडरल काउन्सिलने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या कठोर नियमांनुसार, ते आंतरराष्ट्रीय युद्धात थेट सहभागी असलेल्या देशाला लष्करी पुरवठा करु शकत नाही. २८ फेब्रुवारी २०२६ पाहून मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्यामुळे अमेरिकेसाठी स्वित्झर्लंडने नवीन शस्त्रास्त्र परनाने जारी करणे बंद केले आहे. तसेच स्वीस हवाई क्षेत्राचा वापरावरही निर्बंध लादले आहे. याचा केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशाला सध्याच्या परिस्थिती शस्त्रे पुरवली जाणार नाहीत असे स्वित्झर्लंडने म्हटले आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिका हा स्वीस शस्त्रास्त्रांचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. गेल्या वर्षी स्वित्झर्लंडच्या एकूण शस्त्रास्त्र निर्यातीपैकी सुमारे १०% शस्त्रे अमेरिकेने खरेदी केली होती. हा व्यवहार १११ दशलक्षचा झाला होता. यामध्ये छोटे शस्त्र, दारुगोळी आणि हवाई वाहनांचा समावेश होता. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ही चिंतेते आले आहेत.
स्वित्झर्लंडच्या या निर्णयाचा फटका त्यांच्या संरक्षण उद्योगालाही बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी युक्रेन युद्धाच्या काळातही अशाच निर्णयामुळे स्वीस कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रस्तावर आहे. अमेरिकेसह २५ मित्र देशांना युद्धाच्या काळात शस्त्र देता येतील असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु अद्याप या प्रस्ताववर कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे नव्या निर्बंधामुळे अमेरिकाच नव्हे, तर स्वित्झर्लंडलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे केवळ शस्त्रास्त्रांची नाही, तर जागातिक तेल बाजारपेठही सध्या धोक्यात आहे. ज्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसल आहे. खनिज तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून भारतासह अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहे. शिवाय स्विसच्या शश्त्र पुरवठा थांबवण्याच्या निर्णयामुळे देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: स्वित्झर्लंडने तटस्थ धोरण स्वीकरत अमेरिकेला शस्त्र आणि दारुगोळा पुरवठा थांबवला आहे. आंतररष्ट्रीय युद्धात थेट सहभाग असलेल्या देशांना शस्त्र पुरवठा न करण्याचा नियम आहे.
Ans: स्वित्झर्लंड हा अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा आणि शस्त्रांचा पुरवठादार आहे. त्याच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या संरक्षण पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. नवनी परवानग्या थांबल्याने पुरवठा मर्यादित होऊन इराणविरोधी युद्धात अमेरिका बॅकफुटवर येऊ शकते.






