pak-afg war : ड्युरंड रेषेचा वणवा राजधानीपर्यंत! अफगाणिस्तानच्या ड्रोनने थेट पाकिस्तानचे हमजा मिलिटरी सेंटर उडवले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
भारत आणि जगाचे लक्ष सध्या मध्यपूर्वेकडे असतानाच, आपल्या शेजारील देशांमध्ये युद्धाची भीषण ठिणगी पडली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद (Afghanistan-Pakistan Conflict) आता केवळ ड्युरंड रेषेपुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट राजधानीपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास अफगाणिस्तानच्या हवाई दलाने (Taliban Air Force) इस्लामाबादच्या फैजाबाद भागातील मोक्याच्या ‘हमजा’ लष्करी तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण इस्लामाबाद स्फोटांच्या आवाजाने हादरून गेले असून, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अफगाण ड्रोननी इस्लामाबादमधील पाकिस्तानी लष्कराच्या कमांड सेंटरवर अचूक प्रहार केला. या हल्ल्यात केवळ कमांड सेंटरच नाही, तर सैनिकांची निवासस्थाने आणि मोठा शस्त्रास्त्रांचा साठा असलेला डेपोही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. इस्लामाबादच्या मध्यवर्ती भागात झालेला हा हल्ला पाकिस्तानसाठी सर्वात मोठी नामुष्की मानली जात आहे, कारण राजधानीच्या सुरक्षिततेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Island: जगातील सर्वात अनोखी चव! होर्मुझचे लोक खातात चक्क लाल मातीचा सॉस; जाणून घ्या यामागील सत्य
तालिबान सरकारने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई म्हणजे पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर केलेल्या हल्ल्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे. पाकिस्तानने ‘ऑपरेशन गझब लिल हक’ अंतर्गत काबूल, पक्तिया आणि कंधार यांसारख्या निवासी भागांवर बॉम्बहल्ला केला होता. त्या हल्ल्यात निष्पाप महिला आणि मुलांसह अनेक नागरिक मारले गेले होते. आपल्या नागरिकांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठीच तालिबानने थेट इस्लामाबादच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.
NEW: Authorities in Pakistan now confirm a drone has struck on a military camp in Rawalpindi. The drone struck Hamza Camp Block 28 top floor. No loss of life reported. The explosion however damaged the windows of the building. Footage (1) shows smoke rising from Hamza Camp.… pic.twitter.com/kNF1cHL6rK — Major Sammer Pal Toorr (Infantry Combat Veteran) (@samartoor3086) March 13, 2026
credit – social media and Twitter
या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी तातडीची बैठक बोलावून संपूर्ण इस्लामाबादमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक नाकेबंदी करण्यात आली असून मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानने अद्याप अधिकृतपणे नुकसानीचा आकडा जाहीर केला नसला तरी, स्थानिक सूत्रांच्या मते लष्करी तळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सामान्य जनता आता पुन्हा एकदा हल्ले होतील या भीतीने घराबाहेर पडण्यास घाबरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Missile City: इराणकडे आहे अंडरवर्ल्ड मृत्यू पेरणाऱ्या क्षेपणास्त्रांचा गुप्त अड्डा; अमेरिकन नौदलासाठी ठरणार आव्हान
या वाढत्या तणावामुळे दक्षिण आशियात महायुद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी चीनने आता मैदानात उडी घेतली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अफगाण परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. “रक्तपात थांबवून संवादाने प्रश्न सोडवा,” असा सल्ला चीनने दिला असला तरी, दोन्ही देशांमधील द्वेष पाहता हे इतक्या लवकर शांत होईल असे दिसत नाही.
Ans: तालिबानने इस्लामाबादच्या फैजाबाद परिसरातील 'हमजा' (Hamza Military Center) या लष्करी तळावर ड्रोन हल्ला केला आहे.
Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेत शिरून केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी तालिबानने ही कारवाई केली आहे.
Ans: संपूर्ण इस्लामाबादमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक मुख्य रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत.






