Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teesta River Dispute : भारताला मोठा झटका! बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत; ‘चिकन नेक’वर मोठं संकट?

Teesta River Dispute : तीस्ता नदी वादात चीनच्या एन्ट्रीमुळे भारताची चिंता वाढली आहे. बांगलादेशने या प्रकल्पासाठी चीनकडे १ अब्ज डॉलरची मदत मागितली आहे. यामुळे सिलगुडी कॉरिडोरला धोका निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 17, 2026 | 11:46 AM
Teesta River Dispute

Teesta River Dispute

Follow Us
Follow Us:
  • भारताला मोठा झटका
  • बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत
  • ‘चिकन नेक’वर मोठं संकट?
Teesta River Dispute News Marathi : ढाका : एक खळबळजनक वृत्तसमोर आले आहे. भारत आणि बांगलादेश (Bangladesh)च्या तीस्ता वादात चीनची एन्ट्री झाली आहे. यामुळे भारताच्या चिंतेते भर झाली असून सिलगुडी कॉरिडोरजवळ धोका निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या बांधकामासाठी बांगलादेशने चीनकडे तब्बल १ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८,३०० कोटींची मदत मागितली आहे.

Bangladesh Threat : ‘तर हिंदूना सोडणार नाही’ ; West Bengal मध्ये सत्ताबदलानंतर बांगलादेशी कट्टरपंथी आक्रमक; भारतविरोधी गरळ ओकली

काय आहे तीस्ता वाद?

तीस्ता प्रकल्प भारत आणि बांगलादेशचा पाणी वाटप प्रकल्प आहे.

  • सिक्कीमधील हिमालायत उगम पावणारी तीस्ता नदी ही पश्चिम बांगलमधून वाहत जाते आणि पुढे बांगलादेशला जाऊन मिळते.
  • ही नदी उत्तर बंगाल(भारत) आणि उत्तर बांगलादेशातील लाखो लोकांच्या शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे.
  • या नदीच्या पाणीवाटपावरुन अनेक १९४७ पासून भारत आणि बांगलादेशमध्ये वाद सुरु आहे.
  • बांगलादेशने उन्हाळ्यात भारताने नदीत पुरेसे पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. जेणेकरुन कोरड्या हंगामात येणाऱ्या पिकांचे नुकसान होणार नाही.
  • २०११ मध्ये हा करार अंतिम टप्प्यात होता, मात्र पश्चिम बंगलाच्या विरोधामुळे आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजेमुळे हा करार होऊ शकला नाही. ज्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला.

तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मदतीची भिक

दरम्यान हा करार रखडल्यामुळे बांगलादेशने स्वत:च्या हद्दीत तीस्ता नदी मेगा प्रकल्प आखला. याअंतर्गत पावसाळ्यात नदीला येणाऱ्याला भीषण पुरावर नियंत्रण मिळवणे. तसेच या पाण्याची साठणूक करुन उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी उपब्ध करुन देण्यासाठी मोठे जलाशय बांधण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी बांगलादेशने चीन(China)कडे १ अब्ज डॉलरची मदत मागितली आहे. चीनने देखील आर्थिक निधी आणि तांत्रिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, भारताने याला तीव्र विरोध केला आहे.

काय आहे भारताच्या विरोधाचे कारण?

तीस्ता नदीचा संपूर्ण प्रकल्प भारताच्या अत्यंत संवेदनशील सिलगुडी कॉरिडोर ज्याला चिकन नेक या नावानेही ओळखले जाते याजवळ आहे. हे क्षेत्र भारताच्या सीमांना ईशान्येकडील आठ राज्यांशी जोडते. यामध्ये सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या देशांचा समावेश आहे. या मार्गावरुन भारत या देशांशी थेट व्यापार करु शकतो.

तर वायव्येला नेपाळ आणि ईशान्येला भूतानचे खोरे आहे. या अरुंद मार्गावरुन रस्ते, महत्वाचे रेल्वे मार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन, उच्च व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन ग्रिड, फायबर ऑप्टिक केबल्स आहेत. परिणामी चीनचा या भागात वाढता हस्तक्षेप राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरु शकतो, असे संरक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे भारत तीस्ता वादात चीनच्या सहभागाला विरोध करतो.

बांगलादेशची रणनीती की हतबलता?

सध्या बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान(Tarique Rahman) यांनी चीनकडे या प्रल्पासाठी अधिकृत प्रस्ताव पाठवला आहे. तसेच चीनच्या पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने याचा अंतिम आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशने हा निर्णय उत्तरेकडील भागात शेती आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याने घेतला आहे. भारतासोबत कोणताही अंतिम पाणीवाटप करार न झाल्याने या प्रक्लपाच्या बांधकामाला होणाऱ्या विलंबामुळे हतबल होऊ चीनकडे मदत मागितली जात असल्याचे बांगलादेशने म्हटले आहे.

हा वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दोन्ही देशांना थेट संवादा साधून लवकरात लवकर वाद सोडवण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि बांगलादेशने राजनैतिक चर्चा थांबवू नये, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच मध्यस्थ म्हणून काम करण्यास जपानने तयारी दाखवली आहे.

Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?

💡

Frequently Asked Questions

  • Que: तीस्ता नदी प्रकल्पात भारताची चिंता का वाढली आहे?

    Ans: तीस्ता नदीचा प्रकल्प भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवदेनशील आहे. हा अरुंद मार्ग भारताला ईशान्येकडील आठ राज्यांशी जोडतो. या भागात चीनच्या सहभागामुळे भारताच्या राष्ट्रीय आणि सीमा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

  • Que: भारत बांगलादेश तीस्ता नदीचा वाद काय आहे

    Ans: १९४७ पासून दोन्ही देशांमध्ये तीस्ता नदीच्या पाणीवाटपावरुन वाद सुरु आहे. उन्हाळ्यात नदीतील पाण्याचा प्रवाह कमी असतो ज्यामुळे बांगलादेशच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. भारतासोबत यावर कोणताही ठोस पाणीवाटप करार न झाल्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे.

Web Title: Teesta river dispute india bangladesh china help chicken neck threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Bangladesh
  • China
  • World news

संबंधित बातम्या

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?
1

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?

India Indonesia Relations : चीनला झटका! इंडोनिशायाची भारताच्या डिजिटल मॉडेलला पसंती; PM मोदींच्या दौऱ्यात होणार ऐतिहासिक करार?
2

India Indonesia Relations : चीनला झटका! इंडोनिशायाची भारताच्या डिजिटल मॉडेलला पसंती; PM मोदींच्या दौऱ्यात होणार ऐतिहासिक करार?

दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार; ३० जूनची Deadline ठरत आहे Death Warrant? काय आहे प्रकरण?
3

दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार; ३० जूनची Deadline ठरत आहे Death Warrant? काय आहे प्रकरण?

India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा
4

India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.