फोटो सौजन्य सोशल मीडिया
थायलंडच्या बौद्ध श्रेणीक्रमातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च दर्जा मानला जातो. या पदावर पोहोचणारे ते थायलंडच्या इतिहासातील पहिले परदेशात जन्मलेले भिक्खू ठरले आहेत.
शॉन चिव्हर्टन यांचा जन्म १९५८ मध्ये इंग्लंडमधील आयल ऑफ वाइट येथे झाला. तरुणपणी जीवनाचा अर्थ आणि मानवी दुःख याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना त्यांनी विविध देशांचा प्रवास केला. १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात ते भारतात आले आणि भगवान बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास सुरू केला.
यानंतर त्यांचा प्रवास थायलंडकडे वळला. १९७८ मध्ये ते प्रसिद्ध बौद्ध गुरु लुआंग फो चा यांच्या शिष्यपरंपरेशी जोडले गेले. पुढे त्यांनी थायलंडच्या वनपरंपरेतील बौद्ध साधनेचा स्वीकार केला आणि अध्यात्म, ध्यान व बौद्ध शिकवणीच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं.
अजान जयसारो यांनी अनेक वर्षे थाई आणि इंग्रजी भाषेत बौद्ध धर्माशी संबंधित लेखन आणि अध्यापन केलं. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही विविध धार्मिक पदव्या देण्यात आल्या होत्या. २०२० मध्ये त्यांना थाई नागरिकत्व मिळालं आणि त्यानंतर त्यांच्या धार्मिक कारकिर्दीत आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या.
१४ जुलै २०२६ रोजी थायलंडच्या राजाज्ञेद्वारे आठ वरिष्ठ भिक्खूंना Somdet Phra Rachakhana या पदावर बढती देण्यात आली. त्यामध्ये अजान जयसारो यांचाही समावेश होता. या नियुक्तीमुळे परदेशात जन्मलेल्या व्यक्तीने थायलंडच्या बौद्ध श्रेणीतील एवढ्या उच्च पातळीवर पोहोचण्याचा पहिलाच विक्रम नोंदवला.
Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
अजान जयसारो यांचा प्रवास केवळ एका धार्मिक पदापर्यंत पोहोचण्यापुरता मर्यादित नाही. ब्रिटनमधून भारत आणि त्यानंतर थायलंड असा त्यांचा जवळपास पाच दशकांचा आध्यात्मिक प्रवास राहिला आहे. थायलंडमध्ये राहून त्यांनी बौद्ध धर्मातील ध्यान, शिस्त आणि साधनेच्या परंपरेशी स्वतःला जोडून घेतलं.
त्यांच्या नियुक्तीमुळे थायलंडच्या बौद्ध परंपरेचा आंतरराष्ट्रीय विस्तारही अधोरेखित झाला आहे. परदेशात जन्मलेल्या एका व्यक्तीने थाई बौद्ध व्यवस्थेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या पदापर्यंत पोहोचणं ही या परंपरेतील ऐतिहासिक घटना मानली जात आहे.






