Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Warns Iran : ट्रम्प यांचा इराणला पुन्हा ‘विनाशकारी’ इशारा; प्रोजेक्ट फ्रीडम स्थगित, ४८ तासांत शांतात की युद्ध?

US Iran Ceasefire : मध्यपूर्वेत शांततच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी इराणवर शांतता करारच्या अटी मान्य करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. इराणला बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 10:40 AM
Iran-US Tensions : इराण-अमेरिकेतील संबंध पुन्हा ताणले जाणार? सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतापला; म्हटले, 'अमेरिका हा देश...'

Iran-US Tensions : इराण-अमेरिकेतील संबंध पुन्हा ताणले जाणार? सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतापला; म्हटले, 'अमेरिका हा देश...'

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण युद्ध पेटणार?
  • ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा
  • कराराच्या अटी मान्य करा, नाहीतर…
Donald Trump again Thretens Iran : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) कमालीचा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा इराणला मोठा इशारा दिला आहे. यामुळे युद्धबंदीच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणला अत्यंत कडक शब्दात बजावले आहे. इराणने शांतता कराराच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांच्यावर पुन्हा बॉम्बवर्षाव करण्यात येईल असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran Conflict : युद्ध थांबले? ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली, दिला ‘हा’ कडक इशारा

ट्रम्प यांचा इराणला इशारा

ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट करत इराणला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणने ठरल्याप्रमाणे शांतता कराराच्या अटी मान्य कराव्यात. ‘ऑपरशन एपिक फ्युरी’ चे उद्दिष्ट साध्य झाले असून ही मोहिम बंद करण्यात आली आहे. तसेच होर्मुझ(Hormuz)मधील नाकेबंदी हटवण्यात आली असून इराणसह सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी इराणला शेवचटा अल्टीमेटम दिला आहे. यावेळी इराणने शांतता कराराच्या अटी मान्य केल्या नाहीत तर त्यांच्यावर पुन्हा हल्ले केले जातील. एवढेच नाही तर हे हल्ले पूर्वीपेक्षा अधिकत तीव्र आणि व्यापक असतील, ज्याचा गंभीर परिणाम होईल, असेही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. यासाठी इराणला ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.

ऑपरेशन एपिक फ्युरी

अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरोधात एक लष्करी मोहिम सुरु केली होती. या मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव देण्यात आले होते. दरम्यान या मोहिमेचे उद्दिष्ट साध्य झाले असून ही मोहिम पूर्णपणे थांबवण्यात येत आले असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले. अमेरिका आता युद्ध लढण्यास उत्सुक नाही, तर चर्चेच्या मार्गातून तोडगा काढला जाईल असे त्यांनी म्हटले.

याशिवाय प्रोजेक्ट फ्रीडमही थांबवण्यात आला आहे. ही मोहिमे होर्मुझमध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरु करण्यात आली होती. मात्र, यामुळे इराणने संतापून जहाजांवर हल्ले सुरु केले होते. इराणचे वाढते हल्ले पाहता ट्रम्प यांनी ही मोहिम देखील तातडीने थांबवली आहे.

इराणसमोर आता केवळ दोनच पर्याय

दरम्यान ट्रम्प यांनी इराणविरोधी मोहिम थांबवल्यानंतर त्यांच्यासमोर केवळ दोनच पर्याय ठेवले आहेत.

  • इराणने प्रस्तावित कारारावर स्वाक्षरी करावी, तर त्यांच्यावरील सर्व निर्बंध हटवले जातील आणि व्यापारी मार्ग मोकळा होईल.
  • कराराच्या अटी मान्य न केल्यास अमेरिका पुन्हा इराणला लक्ष्य करेल. आतापर्यंत कोणीही पाहिले नसेल अशी कारवाई केली जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराणकडे लागले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेवर इराण काय प्रतिक्रिया देतो आणि मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होईल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

US Iran Ceasefire : युद्धविराम धोक्यात? होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले सुरुच; इराण युद्ध भडकवत असल्याचा अमेरिकेचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला पुन्हा बॉम्बहल्ल्याची धमकी दिली आहे. इराणने कराराच्या अटी मान्य न केल्यास त्यांच्यावर पुन्हा बॉम्बफेक होईल असे म्हटले आहे. तसेच ही लष्करी कारवाई पूर्वीपेक्षा अधिक विनाशकारी असेल, असेही स्पष्ट केले आहे.

  • Que: प्रोजेक्ट फ्रीडम का थांबवण्यात आले?

    Ans: होर्मुझ खाडीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना बाहेर काढण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली होती. पण इराणने याला तीव्र विरोध केला आणि यूएई व ओमानजवळ हल्ले सुरु केले. ज्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभमीवर ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम थांबवले

Web Title: Trump again threatens iran bombing 48 hours alitimatum us iran ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.