
Trump caught in Putin's trap Alaska meeting will be a 'game changer' for Russia, why
मात्र रशियाने (Russia) ट्रम्प यांच्या या धमक्यांपुढे झुकता, अलास्कामध्ये भेटण्यास सहमती दर्शवली आहे. तज्ज्ञांच्या मते रशियाची ही एक राजनैतिक खेळी आहे. अलास्कामध्ये बैठकीसाठी ट्रम्प तयार होणे हा रशियासाठी अत्यंत महत्वाचा विजय मानला जात आहे. शिवाय ट्रम्प यांनी रशियाला आंतरराष्ट्रीय बहिष्काराच्या धमक्या दिल्या असताना त्यांनी अमेरिकेच्या (America) भूमिकेवर पुतिन यांना आमंत्रित केले आहे. यामुळे अलास्कालातील बैठक रशियासाठी मोठा विजय ठरत असल्याचे मानले जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) अटक वॉरंट जारी केले आहे. मात्र तरीही पुतिन अमेरिकेला भेट देणार आहेत. अटक वॉरंट जारी केल्यापासून पुतिन यांनी कोणत्याही देशाला भेट दिलेली नाही. मात्र, अटक वॉरंट जारी असताना अलास्कामधील बैठक आश्चर्याची मानली जात आहे. यामुळे हा दौरा अटकेपेक्षाही पुतिनसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
रशियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन अलास्काला भेट देणार पहिले रशियन राष्ट्राध्यक्ष असतील. पूर्वी अलास्काचा हा भाद रशियाचा ताब्यात होता, परंतु १८६७ च्या दशकात अमेरिकेने अलास्का ७२ मिलियन डॉलर्ससाठी खरेदी केली. सध्या अलास्का हे अमेरिकेचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वा मोठे राज्य आहे. तसेच रशिया आणि अलास्कामधील अंतर केवळ ५५ मैल म्हणजे ८८ किमी आहे.
Russia Ukraine War : ट्रम्प-पुतिन चर्चेपूर्वी झेलेन्स्कींचा मोठा दावा ; म्हणाले, ‘रशियाला युद्ध…’
बैठकीला झेलेन्स्की उपस्थित राहणार नाही
याच वेळी या बैठीसाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमर झेलेन्स्की (Volodimir Zelensky) उपस्थित राहणार नासून या बैठकीला स्वत:हा झेलेन्स्कींनी सहमती दर्शवली आहे. तज्ज्ञांच्या मते रशिया आणि युक्रेन युद्धावर (Russia Ukriane War) शांतता चर्चेमध्ये दोन्ही गट उपस्थित असणे महत्वाचे आहे. पण झेलेन्स्कींशिवाय ही चर्चा होणार आहे.
यामुळे देखील हा रशियासाठी मोठा विजय मानला जात आहे. यामागचे कारण म्हणजे, जर युक्रेनचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित नसतील तर चर्चेमध्ये घेतलेले कोणतेही निर्णय स्वीकारले जाणार नाहीत.