Russia Ukraine War : ट्रम्प-पुतिन चर्चेपूर्वी झेलेन्स्कींचा मोठा दावा ; म्हणाले, 'रशियाला युद्ध...' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War : कीव : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात येत्या शुक्रवारी (१५ ऑगस्ट) अलास्का मध्ये भेट होणार आहे. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याच वेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodimir Zelensky) यांनी देखील मोठे खळबळजनक विधान केले आहे.
मंगळवारी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) म्हटले की, रशियाला युद्ध संपवायचे नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
१५ ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतिन यांच्या अलास्कामध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) संपवण्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याच वेळी झेलेन्स्कींनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. झेलेन्स्की यांनी रशिया युक्रेनविरोधात लष्करी कारवाई सुरु करत असल्याचे म्हटले आहे, यावरुन रशियाला युद्ध सुरुच ठेवायचे आहे हे स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले.
याच वेळी झेलेन्स्कींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले आहे. परंतु याच वेळी रशियावर दबाव बनवून ठेवणे आवश्यक असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियाची युक्रेनविरोधा कारवाई पूर्णपणे थांबेपर्यंत हे महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच रशियन सैन्याने गेल्या काही दिवसात युक्रेनविरोधात अनेक कारवाया केल्या आहेत. या कारवायांवरुन युक्रेनविरोधात मोठ्या मोहिमेची तयारी सुरु असल्याचे दिसून येते असे झेलेन्स्कींनी म्हटले आहे. यामुळे जागतिक एकता ठेवणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्कींच्या या विधानावर नाराजी व्यक्ती आहे. त्यांनी त्यांच्या या विचाराशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प आणि युरोरियन नेत्यांची झेलेन्स्कींशी देखील चर्चा होणार आहे. युरोपियन नेत्यांनी युक्रेनच्या भूमिकेला समर्थने दर्शवले असून देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि स्वांतत्र्यासाठीच्या मदतीचे पुनरुच्चारन केले आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीकडे लागले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होईल? शांतता करार होईल का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत.