Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Strait: ‘ट्रम्पचे आदेश नाही मानणार’, 10 हजार सैनिकांच्या डोळ्यांदेखत 5 Blacklisted ships पसार; ‘US Navy’ची जगात नाचक्की

US-Iran Tension : होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार सुरू झाली, परंतु उपग्रह माहितीने सत्य उघड केले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही ब्लाक लिस्टेड जहाजे

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 15, 2026 | 11:55 AM
trump hormuz blockade fails blacklisted ships cross us navy iran tension 2026

trump hormuz blockade fails blacklisted ships cross us navy iran tension 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची नाकेबंदी फेल
  • रशिया-चीनची ‘वॉटर गेम’
  • नौदलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

Trump Hormuz blockade failed 2026 : जागतिक राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या विरोधात पुकारलेली नाकेबंदी. पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी इराणची रसद तोडण्यासाठी कडक नाकेबंदी (Blockade) जाहीर केली. मात्र, ताजी उपग्रह चित्रे आणि सागरी ट्रॅकिंग डेटा (Maritime Tracking Data) काही वेगळीच आणि खळबळजनक कथा सांगत आहेत. अमेरिकेने ज्या जहाजांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले होते, त्यापैकी पाच जहाजांनी अमेरिकन नौदलाच्या नाकाखालून हा मार्ग ओलांडला आहे.

काय आहे ‘ब्लॅकलिस्टेड’ जहाजांचे रहस्य?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाने सोमवारपासून होर्मुझमध्ये कोणत्याही जहाजाला प्रवेश न देण्याची शपथ घेतली होती. मात्र, ‘मुरलिखशान’ नावाच्या टँकरने, ज्याचा संबंध रशियन आणि इराणी तेल व्यापाराशी आहे, अत्यंत शिताफीने ही नाकेबंदी तोडली. एवढेच नाही तर चीनशी संबंधित ‘रिच स्टारी’ हे जहाज २,५०,००० बॅरल मिथेनॉल घेऊन कोणत्याही अडथळ्याशिवाय इथून पुढे गेले. अमेरिकेने या जहाजावर आधीच निर्बंध लादले होते, तरीही हे जहाज अमेरिकन युद्धनौकांच्या निगराणीतून कसे सुटले, हा मोठा प्रश्न आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Baloch Freedom: BLAचा पहिला सागरी हल्ला; जिवानीजवळ पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या बोटीवर गोळीबार, 3 जवान ठार, VIDEO VIRAL

लष्करी सामर्थ्य की केवळ देखावा?

अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) चा दावा आहे की त्यांनी १०,००० पेक्षा जास्त सैनिक, डझनभर युद्धनौका आणि विमाने या मोहिमेवर तैनात केली आहेत. पहिल्या २४ तासांत काही लहान जहाजांना मागे फिरण्यास भाग पाडले गेले, हे खरे असले तरी, मोठ्या माशांनी (मोठ्या टँकर्सनी) मात्र पळवाट शोधलीच. लायबेरियन ध्वज असलेला ‘एल्पिस’ हा टँकर इराणच्या बुशेहर बंदरातून निघाला आणि थेट सामुद्रधुनी पार करून गेला. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

BREAKING: Two oil tankers executed 180-degree turns at the Strait of Hormuz within minutes of the US naval blockade taking effect, per MarineTraffic AIS data and CBS News. The Rich Starry, flagged in landlocked Malawi, turned back approximately 20 minutes after the blockade… pic.twitter.com/44VYPZG78k — The Hormuz Letter (@HormuzLetter) April 13, 2026

credit – social media and Twitter

रशिया आणि चीनची उघड पाठराखण

या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, रशिया आणि चीन अमेरिकेच्या या नाकेबंदीला जुमानत नाहीत. ‘मुरलिखशान’ आणि ‘रिच स्टारी’ या जहाजांनी ज्या प्रकारे ही मर्यादा ओलांडली, त्यावरून इराणला या दोन महासत्तांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसून येते. इराणच्या इमाम खोमेनी बंदरावर नांगरलेले ‘ख्रिस्तियाना’ नावाचे मालवाहू जहाजही नाकेबंदीनंतर सहजपणे बाहेर पडले. हे केवळ तांत्रिक अपयश नसून, जागतिक राजकारणातील अमेरिकेच्या घसरत्या प्रभावाचे संकेत असल्याची चर्चा आता संरक्षण तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lebanon Crisis: युगांतराची नांदी! इस्रायल-लेबनॉन दशकांनंतर पहिल्यांदाच एका टेबलवर; मार्को रुबियो यांनी चर्चेला म्हटले ऐतिहासिक

जागतिक तेल व्यापारावर परिणाम

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात संवेदनशील व्यापारी मार्ग आहे. जर ही नाकेबंदी अशीच विस्कळीत राहिली, तर जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण होईल. एका बाजूला अमेरिका म्हणतेय की मार्ग बंद आहे आणि दुसऱ्या बाजूला जहाजे जात आहेत, यामुळे जहाज वाहतुकीचा विमा (Insurance) आणि सुरक्षिततेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ट्रम्प आता या अपयशानंतर लष्करी कारवाई अधिक तीव्र करणार की रशिया-चीनच्या दबावासमोर झुकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांची होर्मुझ नाकेबंदी यशस्वी का झाली नाही?

    Ans: अमेरिकन नौदलाची मोठी फळी तैनात असतानाही, रशिया आणि चीनशी संबंधित किमान पाच ब्लॅकलिस्टेड जहाजांनी तांत्रिक पळवाटा शोधून हा मार्ग यशस्वीपणे पार केला.

  • Que: कोणती प्रमुख जहाजे अमेरिकेच्या निगराणीतून निसटली?

    Ans: 'मुरलिखशान', 'एल्पिस', 'रिच स्टारी' आणि 'ख्रिस्तियाना' यांसारख्या मोठ्या टँकर्सनी आणि मालवाहू जहाजांनी अमेरिकेची नाकेबंदी तोडली.

  • Que: या घटनेमुळे अमेरिकन लष्करावर काय परिणाम झाला आहे?

    Ans: सेंटकॉमच्या (CENTCOM) १०,००० सैनिकांच्या तैनातीनंतरही ही जहाजे निसटल्याने अमेरिकेच्या जागतिक लष्करी प्रतिमेला धक्का बसला आहे.

Web Title: Trump hormuz blockade fails blacklisted ships cross us navy iran tension 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार
1

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार

Sheikh Hasina: ‘मला मारा किंवा बंदिस्त करा डिसेंबरमध्ये बांगलादेशात येत आहे…’, शेख हसीनाची मोठी घोषणा
2

Sheikh Hasina: ‘मला मारा किंवा बंदिस्त करा डिसेंबरमध्ये बांगलादेशात येत आहे…’, शेख हसीनाची मोठी घोषणा

Columbia News: कोलंबिया हादरलं! सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 14 ठार अनेक जण जखमी
3

Columbia News: कोलंबिया हादरलं! सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 14 ठार अनेक जण जखमी

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?
4

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.