Halloween Horror : अमेरिकेत हॅलोवीन पार्टी रक्तरंजित ; नॉर्थ कॅरोलिनातील गोळीबारात २ ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मॅक्सटनच्या डिक्सन ड्राइव्ह परिसरात पहाटे तीनच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथाकाने तातडीने धाव घेतली. संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला होता. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीमध्ये १५० हून अधिक लोक उपस्थित होते.
गोळीबारामुळे लोकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरु झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जणांवर गोळीबार करण्यात आला. यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मॅक्सटनच्या अधिकाऱ्यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती
संदेवना व्यक्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गोळीबारा मागचे कारण अस्पष्ट असून प्रत्यक्षदर्शीनींची चौकशी केली जात आहे. अद्याप हल्ला कोणी केला हेही स्पष्ट झालेले नाही. यामुळे सध्या पोलिसांना नागरिकांना घटनेबाबत कोणतीही माहिती असेल
तर त्यांना सांगण्यास सांगितले आहे. या चौकशीमध्ये नॉर्थ कॅरोलिना स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (SBI) देखील सहभागी आहे.
गेल्या काही काळात अमेरिकेच्या गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. यापूर्वी २२ ऑक्टोबर रोजी २८ वर्षीय डेरियस मॅकनील याची हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वादातून
ही घटना घडली होती. सध्या या घटनांवर आणि वाढत्या हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. अमेरिकेत कुठे घडला गोळीबार?
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनातील मॅक्सटन शहराबाहेर डिक्सन ड्राइव्ह परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे.
प्रश्न २. नॉर्थ कॅरोलिनातील गोळीबाराच्या घटनेत किती जीविताहानी झाली?
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू आणि ११ जण जखमी झाले आहे.
9/11 Attack : महिलेच्या वेशात पळाला होता कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन; CIA च्या माजी एजंटचा दावा






