Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी

America Shutdown update : अखेर अमेरिकेत पुन्हा सरकारी कामकाजाला सुरुवात होत आहे. ट्रम्प सरकारचे निधी विधेयक मंजूर झाले आहे. हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 13, 2025 | 10:36 AM
Trump signs Funding bill to end longest shutdown in US history

Trump signs Funding bill to end longest shutdown in US history

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत लवकरच सुरु होणार सरकारी कामकाज
  • फंडिग बिल मंजूर झाल्याने ट्रम्प सरकारला दिलासा
  • इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन

America Shutdown News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ४३ दिवसाच्या शटडाऊननंतर ट्रम्प सरकारचे निधी विधेयक मंजूर झाले असून सरकारी कामकाजाल लवकरच सुरुवात होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या फंडिग बिलावर स्वाक्षरी केली आहे. हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात चांगला दिवस होता असे ट्रम्प यांनी म्हटले.

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर

ओव्हल ऑफिसमध्ये विधेयकावर ट्रम्प करणार स्वाक्षरी

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(१२ नोव्हेंबर) अमेरिकन काँग्रेसने निधी विधेयक मंजुर केले असून ट्रम्प यांनी यावर ओव्हल ऑफिसमध्ये स्वाक्षरी केली आहे.  यामुळे अमेरिकेच्या सामान्य जनतेला देखील मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच विनावेतन सुट्टीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील आनंद झाला आहे.

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन

हे अमेरिकेच्या इतिहासातील दुसरे सर्वात मोठे शटडाऊन होते. यापूर्वी अध्यक्ष ट्रम्प यांच्या काळात २०२० मध्ये ३५ दिवसांसाठी शटडाऊन लागू झाले होते. आताचे २०२५ चे शटडाऊनचे मुख्य कारण म्हणजे, निधी विधेयकातील हेल्थ सबसिडीवर रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स मधील मतभेद.

डेमोक्रॅट पक्षाने या हेल्थ केअर सबसिडीत वाढ करण्याची मागणी केली होती, पण ट्रम्प सरकारने याला नकरा दिला होता. यामुळे सरकारचा अनैतिक खर्च वाढेल असे म्हटले होते. तसेच दोन्ही बाजूंनी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी कोणीही तयार नव्हते.

VIDEO | US House passed a bill to end the nation’s longest government shutdown, sending the measure to President Donald Trump for his signature after a historic 43-day funding lapse that saw federal workers go without multiple paychecks, travellers stranded at airports. (Source:… pic.twitter.com/crcX4HZvgm — Press Trust of India (@PTI_News) November 13, 2025

अमेरिकेचे रखडलेले सरकारी कामकाज पुन्हा सुरु

आता हे निधी विधेयक मंजूर झाले असून सरकारी कामकाजाला तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे. ३० जानेवारी २०२६ य नवीन निधीची अंतिम तारीख असणार आहे, परंतु तज्ज्ञांच्या मते, यामुळे २०२६ अखेरपर्यंत अनेक सरकारी कामकाजांना निधी मिळणार आहे.

अमेरिकेच्या सिनेटमध्ये निधी विधेयकायवर ११ वेळा मतदान करण्यात आले होते, पण ट्रम्प सरकारला ६० पैकी केवळ ५५ मते मिळाली होती. यामुळे देशातील लष्कर, हवाई सेवा यांसारख्या अनेक कामकाजांवर मोठा परिणाम झाला होता. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. तसेच याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही परिणाम झाला आहे.

काय असते शटडाऊन?

प्रत्येक देशाचा एक वार्षिक खर्चाचा आराखडा दरवर्षी तयार केला जातो. पण या खर्चावर सरकारमध्ये राजकीय मतभेद किंवा एकमत झाले नाही याला कायदेशीररित्या मान्यता मिळत नाही. अशा परिस्थिती सरकारला अनावश्यक सेवा बंद कराव्या लागतात. यालाच सरकारी शटडाऊन म्हणतात. अमेरिकेत देखील रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट्समधील आरोग्य सेवांवरील सबसिढी वाढवण्याचा मतभेदांमुळेच सरकारी कामकाज ठप्प झाले होते.

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द

Web Title: Trump signs funding bill to end longest shutdown in us history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL
1

व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन
2

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन

अमेरिकेची मोठी कारवाई; भारतासह 7 देशांमधील 32 कंपन्यांवर निर्बंध, कारण काय तर..
3

अमेरिकेची मोठी कारवाई; भारतासह 7 देशांमधील 32 कंपन्यांवर निर्बंध, कारण काय तर..

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
4

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.