Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांत पाठवले दूत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द
शटडाऊनमुळे अमेरिकेतील लाखो नागरिकांना अन्न निधी बंद झाली आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारही अद्याप मिळालेल्या नाही. हवाई सेवेवर, लष्करावर याचा मोठा परिणाम होत आहे. अनेक गंबीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान ट्रम्प यांनी शटडाउन संपवण्याचा दिशेने वरिष्ठ सभागृह सिनेटने पाऊल उचलेल असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे फंडिग बिल पास न झाल्याने १ ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे मुख्य कारण म्हणजे हेल्थ केअर सबसिडीवरील रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स मधील मतभेद आहेत. डेमोक्रॅट पक्षाने या हेल्थ केअर सबसिडीत वाढ करण्याची मागणी केली होती, जी मान्य करण्यास रिपब्लिकन पक्षाने नकार दिला होता. परंतु आता यावर चर्चा होणार आहे. यासाठी डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्यांच्या एका समूहाने हमीशिवाय आरोग्य सेवा अनुदान वाढविण्याच्या चर्चेवर सहमती दिली आहे. यामुळे ही चर्चा झाली की योग्य तो निर्णय घेऊन शटडाउन संपवले जाईल असे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी शटडाऊनवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही शटडाऊन संपवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या अगदी जवळ आहोत. आपल्या देशात येणाऱ्या कैद्यांना आणि बेकायदेशी स्थलांतरितांना पैस देण्यास आम्ही सहमत नाही. मला वाटते की, डेमोक्रॅट्सच्या हे लक्षात आले आहे. यामुळे आता नक्कीच शटडाऊन संपेल.
अमेरिकेच्या सिनेटमध्ये निधी विधेयक मंजूर न झाल्याने शटडाऊन सुरु झाले. आतापर्यंत ११ वेळा मतदान करण्यात आले, पण ट्रम्प सरकारला ६० पैकी केवळ ५५ मते मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शटडाउन सुरु असल्याने याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. तसेच याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही परिणाम झाला आहे.
प्रत्येक देश आपल्या देशाचा वार्षिक खर्च निश्चित करतो असतो. जर या खर्चावर सरकारमध्ये राजकीय मतभेद किंवा एकमत झाले नाही तर सरकारकडे कायदेशीररित्या निधी नसतो. अशा परिस्थिती सरकारला अनावश्यक सेवा बंद कराव्या लागतात. ज्याला सरकारी शटडाउन म्हणतात. अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट्समधील आरोग्य सेवांवरील सबसिढी वाढवण्याचा मतभेदांमुळेच सरकारी कामकाज ठप्प झाले होते. पण ट्रम्प यांनी आता हे शटडाउन लवकरच संपणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे सध्या सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
Ans: अमेरिकेत गेल्या ४० दिवसांपासून सुरु आहे शटडाऊन?
Ans: ट्रम्प यांनी शटडाऊनवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही शटडाऊन संपवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या अगदी जवळ आहोत.






