Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Slams Iran : ‘आता पुरे झाले, हे थांबवा…’ , इराणच्या हल्ल्यानंतर भडकले ट्रम्प; नेतन्याहूंनाही केला फोन

Trump Slams Iran : पश्चिम आशियात इराण-इस्रायली हल्ल्यांमुळे पुन्हा तणाव निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी थेट इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 09:51 AM
Trump Slams Iran

Trump Slams Iran

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या इस्रायलवर हल्ल्यानंतर संतापले ट्रम्प
  • नेतन्याहूंनाही केला फोन म्हणाले…
  • मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता
Trump Slams Iran : वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष (Iran Israel War) पुन्हा पेटला आहे. नुकतेच दोन्ही देशांनी एकमेकांवर भीषण हल्ले केले आहेत. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

World War 3: लक्ष्मणरेषा ओलांडली! इराणने इस्रायलवर डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे; ट्रम्प मैदानात तर अमेरिकेलाही महायुद्धाची धमकी

रविवारी (०७ जून) इराणने रात्री उशिरा इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यानंतर इस्रायलने देखील पलटवार करत सोमवारी (०८ जून) सकाळी इराणच्या सीमेबाहेरुन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा केला. राजधानी तेहरानसह ४ शहांरमध्ये भीषण स्फोट झाले. या हल्ल्यांनतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले ट्रम्प?

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, आता दोन्ही देशांनी हल्ले थांबवावेत आणि पुन्हा चर्चेला सुरुवात करावी. ट्रम्प यांनी म्हटले की, इराण अमेरिका शांतता कराराच्या अंतिम टप्प्यात पोहोतले आहेत. येत्या काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये करारावर अंतिम स्वाक्षरी होणार होती, परंतु या हल्ल्यांमुळे परिस्थिती पुन्हा अस्थिर बनली आहे. यामुळे त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी इस्रायल(Israel)-इराणला स्पष्ट शब्दांत सांगितले की, बस झालं आता, हल्ले थांबवा. आता आणखी संघर्षाची गरज नाही.

नेतन्याहूंनाही फोन

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanhyahu) यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी ट्रम्प यांनी इस्रायलला तातडीने प्रत्युत्तरात्मक कारवाई न करण्याचे आवाहन केले होते. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध भडकू नये यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरेल असे त्यांनी म्हटले. परंतु नेतन्याहूंनी ट्रम्प यांच्या आवाहानाला धुडकावून लावले आणि इराण(Iran) वर हल्ला केला.

इस्रायलने इराणच्या हल्ल्याला मोठी चूक संबोधले

दरम्यान इस्रायलने इराणच्या कारवाईनंतर देशात हाय अलर्ट जारी केला आहे. इस्रायलच्या उत्तरी भागात सायरन वाजवण्यात आले असून सुरक्षेचे नियम कडक करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

इराणच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत, इस्रायली संरक्षण दलाने याला मोठी चूक संबोधले आहे. तसेच पुन्हा हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तराचा इशाराही दिला आहे. तर दुसरीकडे इराणनेही त्यांच्यावर हल्ला झाल्यास सागरी मार्गावर कडक निर्बंधाची धमकी दिली आहे. यामुळे मध्यपूर्वेत आणखी तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Israel Airstrike Iran : ट्रम्पही थांबवू शकले नाहीत! इस्रायलचा इराणवर पलटवार; तेहरानसह ४ शहरांत भीषण हल्ले

Web Title: Trump slams iran after attack on israel netanyahu phone call

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.