Israel Airstrike Iran : ट्रम्पही थांबवू शकले नाहीत! इस्रायलचा इराणवर पलटवार; तेहरानसह ४ शहरांत भीषण हल्ले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने रविवारी (०७ जून) उशिरा इस्रायवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या हल्ल्यानंतर ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात फोनवर संवाद झाला होता. यावेळी ट्रम्प यांनी इस्रायलने पलटवार न करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले जात आहे.
त्यांनी इस्रायलला इराणवर हल्ले न करण्याचे आवाहन केले होते. मध्यपूर्वेत मोठे युद्ध भडकू नये यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु असून नेतन्याहूंनी संयम बाळगावा असे म्हटले होते. परंतु बेंजामिन नेतन्याहूंनी (Benjamin Netanyahu) राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत कारवाई केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या हद्दीत न घुसताच ही कारवाई केली आहे. इराणच्या सीमेबाहेरुन लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देण्याच्या उद्देशाने हे हल्ले बाहेरुन करण्यात आले.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलचे हल्ले सुरुच राहिले तर होर्मुझ (Hormuz) मार्गावर पुन्हा निर्बंध लादले जातील. इस्रायलला याचे गंभीर परिणाम भोगावे लागती असाही इशारा इराणने दिला आहे.
दोन्ही देशांत सुरु झालेल्या या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. अमेरिका दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करत आहे. परंतु इराण-इस्रायलने थेट संघर्षाला सुरुवात केल्याने जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. होर्मुझचा मार्ग पुन्हा बंद होऊन जागतिक स्तरावर पुन्हा इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
ISRAEL BOMBS ACROSS IRAN WITH CRUISE MISSILES & WARPLANES FROM TEHRAN TO TABRIZ KARAJ NAJAFABAD & ISFAHAN — reports pic.twitter.com/aCXwsFkgfL — RT (@RT_com) June 8, 2026






