Trump administration freezes $2.2 billion in grants to Harvard University, Why
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या त्यांनी टॅरिफच्या निर्णयाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहेत. तसेच त्यांनी अमेरिकेतही आपल्या निर्णयांनी मोठी खळबळ उडवली आहे. यामुळे हजारो अमेरिकेन लोक ट्रम्प विरोधात आले आहेत. दरम्यान त्यांनी हावर्ड युनिवर्सिटीवर मोठा कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाउसने हार्वर्ड विद्यापीठाला मिळाणारे 2.2 अब्ज डॉलरचे अनुदान स्थगित केले आहे.
ट्रम्प प्रशासनाने युनिव्हर्सिटीवर कॅम्पस अॅक्टिव्हिटी थांबवण्याच्या मागमीचे पालन करण्यास विद्यापीठाने नकार दिला. यामुळे ट्रम्प यांनी विद्यापीठाविरोधा मोठी कारवाई केली. कॅम्पसमदील विद्यार्थ्यांच्या सक्रिय आंदोलनाला आळा घालण्यास विद्यापीठाने नकार दिला. म्हमून ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाला पत्र लिहले. त्यांनी विद्यापीठाला काही नियमांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले. परंतु विद्यापीठाने यासही नकार दिला.
ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रात, मेरिट बेस प्रवेश आणि भरती पद्धतीचा अवलंब करणे, विद्यार्थ्यांचे ऑडिट करणे, विविधतेबद्दल विचार मांडणे आणि फेस मास्कवर बंदी असे नियम लागू करण्याचे आदेश दिले होते. हे नियम पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांना रोखण्यासाठी देण्यात आले होते. परंतु विद्यापीठाने हे नियम लागू करण्यास नकार दिला.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला “गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना, बेकायदेशीर हिंसाचार किंवा बेकायदेशीर छळाला” प्रोत्साहन देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निधीवर बंदी घालण्याचे आवाहन केले.
हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प यांच्या या पत्राच्या उत्तरात म्हटले की, प्रशासनाच्या या मागण्या विद्यापीठाच्या पहिल्या दुरुस्ती अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या आहेत, तसेच संघीय अधिकाराचा अतिरेक आहेत. यामुळे विद्यापाठी स्वत:च्या स्वातंत्र्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. विद्यापीठाच्या धोरणामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.
याशिवाय विद्यापीठाने असेही म्हटले की, शैक्षणिक संस्थांमध्ये कोणाताही राजकीय हस्तक्षेप अस्वीकार्ह आहे. यामुळे आम्ही कोणतेही राजकीय आदेश स्वीकारणार नाही. तसेच विद्यापीठाने यहूदी-विरोधी आंदोलनांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई केली आहे. परंतु हे बदल सरकारी आदेशांवर नसून विद्यापीठांच्या नियमांनुसार आहेत.
यापूर्वी ट्रम्प यांनी इतर अनेक विद्यापीठांचे अनुदान स्थगित केले आहे. यामध्ये पेनसिल्व्हेनिया, ब्राउन आणि प्रिन्सटन विद्यापीठांना मिळणारा संघीय निधी देखील थांबवण्यात आला आहे. यानंतर, कोलंबिया विद्यापीठाला एक पत्रही पाठवण्यात आले, त्यानंतर विद्यापीठाने धोरणात महत्त्वाचे बदल केले.