ब्लू ओरिजिनचं ऑल वुमन मिशन यशस्वी; हॉलीवूड गायिका केटीपेरीसह सहा महिलांनी घेतली अंतराळात झेप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे उद्योगपती जेफ बेजोस यांच्या ब्लू ऑरिजिन या स्पेस टेक्नोलॉजीन त्यांचे मिशन NS-31 यशस्वीरित्या पूर्ण करुन एक ऐकिहासिक अंतराळ प्रवास घडवून आणला आहे. या मिशनमध्ये केवळ महिलांनी सहभाग घेतला होता. या मिशसनचे नाव ऑल वुमन मिशन असे होते. या मिशनमध्ये बेजोस यांची मंगेतर लॉरेन सांचेज, प्रसिद्ध हॉलीवुड सिंगर केटी पेरी, सीबीएस मॉर्निंग्सच्या को-प्रेझेंटर गेल किंग, नासा इंजिनिअर रहिवासी आयशा बोवे, शास्त्रज्ञ अमांडा गुयेन आणि फिल्ममेकर केरियन फ्लिन या सर्व महिला या विशेष प्रवासात सहभागी झाल्या.
या महिला अंतराळवीरांनी ब्लू ऑरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून अंतराळात उड्डाण केले. पश्चिम टेक्सास येतून अंतराळाचे लॉन्चिंग करण्यात आले. या प्रवासादरम्यान सुमारे 10 मिनिटे या महिलांनी झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतला. हे रॉकेट सुमारे 105 किलोमीटर उंचीवर पोहोचले होते. हे मिशन खासगी अंतरिक्ष पर्यचनासाठी एक महत्वाचे पाभल मानले जात आहे. यापूर्वी केवळ पारिंपारिक व्यावसायिक अंतरावीरांनी उड्डाण केले आहे.
A smooth landing in West Texas.
Book your flight on New Shepard: https://t.co/RP3Lixyr4Y pic.twitter.com/xPiu9LMtlH
— Blue Origin (@blueorigin) April 14, 2025
✨ Weightless and limitless. pic.twitter.com/GQgHd0aw7i
— Blue Origin (@blueorigin) April 14, 2025
लॉरेन सांचेज या पूर्वी टीव्ही पत्रकार आणि हेलिकॉप्टर पायलट होत्या. त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना या अनोख्या अनुभवासाठी आमंत्रित केले. विशेष म्हणजे, ही यात्रा त्यांच्या आणि बेजोसच्या वेनिसमध्ये होणाऱ्या लग्नाच्या दोन महिने आधी यशस्वी झाली आहे. दिग्दर्शक कॅरिन फ्लिन, माजी इंजिनीयर आयशा बोवे आणि शास्त्रज्ञ अमांडा गुयेन या देखील या अंतराळ उड्डाणाचा भाग होत्या.
ब्लू ओरिजिनने या अंतराळ प्रवासासाठी किती खर्च आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. हा अनुभन पैशाच्या पलीकडचा असल्याचे सहभागी महिलांना म्हटले आहे. हॉलीवूड गायक केटी पेरी यांनी पृथ्वीवर लॅन्ड करतानाचा अनुभव सांगितला. त्यांनी प्रवासादरम्यान, “व्हॉट अ बंजरफुर वर्ल्ड” गाणे गायले.
अंतरिक्षात एकाच वेळी सर्व महिलांनी उड्डण केलेली ही अमेरिकेची पहिलीच मोहीम होती. ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. यापूर्वी 1963 मध्ये रशियन अंतरिक्षवीर व्हॅलेंटीना टेरेश्कोव्हा यांनी एकटीने अंतरिक्ष उड्डाण केले होते. या महिलांच्या प्रवासाने नव्या पिढीला स्वप्न पाहण्यास आणि अंतरिक्षाचा वेध घेण्यास प्रेरणा दिली आहे.