Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Biolabs: अँथ्रॅक्स, इबोला अन् सार्स… 30 हून अधिक देशांत अमेरिकेच्या गुप्त ‘बायोलॅब्स’; तुलसी गबार्ड यांनी सत्य आणले जगासमोर

US Funded Biolabs : तुळसी गबार्ड म्हणाल्या की, या घडामोडींवर पुरेसे नियंत्रण ठेवले जात नाही, ज्यामुळे जागतिक आरोग्य सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेने जगभरातील ३० हून अधिक देशांमधील १२० हून अधिक जैविक प्रयोगशाळांना (बायोलॅब्स) निधी पुरवला होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 13, 2026 | 09:32 AM
tulsi gabbard reveals us funded biolabs ukraine pathogens trump bans funding

tulsi gabbard reveals us funded biolabs ukraine pathogens trump bans funding

Follow Us
Follow Us:
  • तुलसी गबार्ड यांचा महाविस्फोट
  • भयंकर विषाणूंवर संशोधन
  • ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

Tulsi Gabbard US funded biolabs : जागतिक स्तरावर महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या (America)  अंतर्गत गोटातून सध्या एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोना महामारीच्या भीषण अनुभवानंतर जग आता कुठे सावरत असताना, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक (DNI) तुलसी गबार्ड यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेत भर घालणारा एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. नुकत्याच सार्वजनिक करण्यात आलेल्या अत्यंत गोपनीय कागदपत्रांच्या हवाल्याने गबार्ड यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने स्वतःच्या देशाबाहेर तब्बल ३० हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या १२० पेक्षा जास्त जैविक प्रयोगशाळांना (बायोलॅब्स) मोठा आर्थिक निधी पुरवला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रयोगशाळांमध्ये अत्यंत घातक विषाणू आणि जीवाणूंवर मानवी आरोग्याला धोक्यात आणू शकणारे संशोधन सुरू होते.

‘गेन-ऑफ-फंक्शन’ आणि धोकादायक रोगजंतूंचे छुपे साम्राज्य

तुलसी गबार्ड यांनी उघड केलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय गुप्तचर संचालनालयाच्या (ODNI) प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रयोगशाळांमध्ये केवळ सामान्य वैज्ञानिक संशोधन चालत नव्हते, तर तिथे ‘गेन-ऑफ-फंक्शन’ (Gain-of-Function) सारखे अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त प्रयोग केले जात होते. ‘गेन-ऑफ-फंक्शन’ म्हणजे एखाद्या नैसर्गिक विषाणू किंवा रोगजंतूची क्षमता, त्याची पसरण्याची गती आणि त्याची घातकता कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत वाढवणे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानुसार, या प्रयोगशाळांवर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेचे किंवा अमेरिकन प्रशासनाचे थेट आणि कडक नियंत्रण नव्हते. यामुळे जर एखादा विषाणू चुकूनही या प्रयोगशाळांमधून बाहेर पडला (Lab Leak), तर तो जागतिक पातळीवर दुसरी मोठी महामारी आणू शकत होता, अशी भीती आता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?

युक्रेनमधील ४० प्रयोगशाळा आणि सोव्हिएत काळातील जैविक शस्त्रांचे कनेक्शन

या संपूर्ण खुलाशामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते युक्रेनमधील प्रयोगशाळांनी. सार्वजनिक झालेल्या अधिकृत दस्तऐवजांनुसार, एकट्या युक्रेनमध्ये ४० हून अधिक अशा प्रयोगशाळा कार्यरत होत्या, ज्या थेट सोव्हिएत युनियनच्या काळातील जैविक शस्त्रांशी (Biological Weapons) संबंधित असलेल्या अत्यंत प्राणघातक रोगजंतूंवर काम करत होत्या. या यादीमध्ये अँथ्रॅक्स (Anthrax), इबोला (Ebola), मर्स (MERS), सार्स (SARS) आणि प्राचीन काळातील महाभयंकर प्लेग (Plague) यांसारख्या जैविक कचऱ्याचा आणि मानवी आरोग्याला काही क्षणात संपवणाऱ्या घटकांचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थितीत किंवा पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसताना या प्रयोगशाळांमध्ये असे काम चालणे म्हणजे संपूर्ण युरोपसह जगाला मृत्यूच्या खाईत लोटण्यासारखे आहे, असा आरोप गबार्ड यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

माजी प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर सत्याची गळचेपी केल्याचा गंभीर आरोप

हा केवळ एक सुरक्षेचा प्रश्न नसून अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातील एक मोठे वादळ ठरले आहे. तुलसी गबार्ड यांनी थेट आरोप केला आहे की, अमेरिकेच्या मागील प्रशासनांनी, काही ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेतील विशिष्ट लॉबीने या जैविक प्रयोगशाळांच्या अस्तित्वाचे संपूर्ण सत्य अमेरिकन जनतेपासून आणि जगापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवले. एवढेच नव्हे, तर भूतकाळात ज्या ज्या वेळी काही प्रामाणिक अधिकारी किंवा पत्रकारांनी या प्रयोगशाळांबद्दल आणि तिथल्या धोक्यांबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी त्यांची जागा दाखवून देत त्यांचे आवाज दाबण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले गेले. हा जनतेच्या विश्वासाला दिलेला मोठा तडा आहे, असेही गबार्ड यांनी स्पष्ट केले.

Today, I’m releasing never before seen intelligence revealing new evidence of past US government funding for more than 120 biolabs in over 30 countries, including Ukraine. In support of President Trump‘s Executive Order to end federal funding of dangerous gain of function… pic.twitter.com/RkPHnAbka9 — DNI Tulsi Gabbard (@DNIGabbard) June 12, 2026

credit – social media and Twitter

ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये: जागतिक सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

तुलसी गबार्ड यांच्या या धक्कादायक अहवालानंतर वॉशिंग्टनमध्ये प्रचंड वेगाने राजकीय हालचाली झाल्या. देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत ‘गेन-ऑफ-फंक्शन’ संशोधनासाठी आणि परदेशातील अशा संशयास्पद प्रयोगशाळांसाठी दिला जाणारा अमेरिकेचा सर्व प्रकारचा संघीय निधी (Federal Funding) तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या मते, अशा प्रकारच्या अनिबंध आणि अनियंत्रित संशोधनामुळे जागतिक आरोग्य सुरक्षेला अभूतपूर्व आणि गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिका आता यापुढे अशा कोणत्याही प्रयोगांना प्रोत्साहन देणार नाही, ज्यामुळे मानवजात धोक्यात येईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?

परदेशातील प्रयोगशाळांवर वाढवली नजर: काय होणार पुढे?

आपले पद सोडण्यापूर्वी तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या सर्व गुप्तचर यंत्रणांना परदेशात चालणाऱ्या या प्रयोगशाळा, तिथे साठवलेले प्राणघातक रोगजंतू आणि सध्या सुरू असलेल्या सर्व संशोधनांची इत्थंभूत माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. प्राथमिक तपासातून काही अघोषित आणि संशयास्पद क्लिनिकल चाचण्या देखील समोर आल्या आहेत. यामुळे केवळ सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झाला नसून, गंभीर नैतिक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या चिंताही वाढल्या आहेत. येत्या काळात या प्रयोगशाळांचे पूर्ण सत्य जगासमोर आणण्यासाठी अमेरिका पावले उचलणार असून, या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश केला जाईल, असे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

Web Title: Tulsi gabbard reveals us funded biolabs ukraine pathogens trump bans funding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • America
  • intelligence agency
  • World news

संबंधित बातम्या

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
1

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
2

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
3

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
4

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.