Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एर्दोगानने केला पुतिनचा ‘डबल गेम’; रशिया युद्धात युक्रेनला पुरवली ‘हे’ मोठे शस्त्र

भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान मुस्लिम देश तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दर्शवला आहे. तुर्की इस्लामिक देशांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. आता तुर्कीने रशियासोबतही नवा डाव खेळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2025 | 06:50 PM
Turkey supplied Bayraktar TB-2 drones to Ukraine played 'double game' with Russia

Turkey supplied Bayraktar TB-2 drones to Ukraine played 'double game' with Russia

Follow Us
Follow Us:

अंकारा: भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान मुस्लिम देश तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दर्शवला आहे. तुर्की इस्लामिक देशांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. तुर्कीचे रशियासोबत संबंध राजनैतिक दृष्टीकोनातून चांगले आहेत. गेल्या अनेक काळापासून तुर्कीने युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला आपला उघड पाठिंबा दर्शवला आहे. परंतु तुर्कीने रशियासोबत दुहेरी खेळ खेळला असल्याचे मानले जात आहे.

एकीकडे अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर निर्बंध लादत आहे, तर दुसरीकडे तुर्कीने रशियाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिका आणि युरोपीय देशांच्या रशियावरील निर्बंधाला विरोध केला आहे. तुर्कीने रशियन नागरिक, पर्यटक आणि स्थलांतरितांसाठी दरवाजे खुले केले आहे. तसेच रशियन कंपन्यांनाही तुर्कीत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. पण पुतिन यांना त्यांच्या एर्दोगानच्या एका कृतीमुळे संताप अनावर झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझात मदत केंद्रावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; हमासकडून तीव्र निषेध, म्हणाला ‘नरसंहार…’

असे काय केले तुर्कीने की संतापले पुतिन?

काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार , तुर्कीने युक्रेनला धोकादायक ड्रोनचा पुरवठा केला आहे. या ड्रोनच्या मदतीने युक्रेनने रशियाचे ४० बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने नष्ट केली आहेत. हे ड्रोन बायरक्तार टीबी-२ आहेत. हे ड्रोन तुर्की बनावटीचे आहे. जगभरात या ड्रोनला त्यांच्या प्राणघातक क्षमतेसाठी ओळखले जाते.

बायरक्तार टीबी-२ हे एक आत्याधुनिक तंत्रज्ञानाचे लढाऊ ड्रोन आहे. हे ड्रोन पाळत ठेवण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठीही वापरले जातात. याची रचना सरळ पंख, मागील बाजूस प्रोपेलर आणि अचूक लक्ष्य ठेवण्याची क्षमता अशी आहे. या ड्रोनचे पहिले उड्डाण २०२४ मध्ये करण्यात आले होते. या ड्रोनच्या ६०० हून अधिक युनिट्स तयार करण्यात आल्या होत्या. २०१९ ते २०२२ पर्यंत युक्रेनला ७२ ड्रोन मिळाले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, तुर्कीने केवळ युक्रेनला मदत करण्यासाठीच नव्हे तर अमेरिका आणि नाटो देशाला खुश करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. तुर्की हा नाटो देशाचा सदस्य आहे. रशियापासून दूर राहण्यासाठी अमेरिकेने अनेकवेळा तुर्कीवर दबाव टाकला आहे.

परंतु एकीकडे तुर्कीने रशियाशी मैत्री असल्याचे दाखवून पुतिन यांच्यासोबत डबल गेम केला आहे. यामुळे रशिया आणि तुर्कीच्या संबंधावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुतिन यांनी तुर्कीच्या एर्दोगानवर संताप व्यक्त केला आहे. याच वेळी तुर्की आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला रशिया-युक्रेनमध्ये मध्यस्थीचा देश म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु रशिया किंवा भारतासाठी तुर्की विश्वासार्ह नाही असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता! पुन्हा एकदा काठमांडूत राजेशाही समर्थनार्थ तीव्र आंदोलन

Web Title: Turkey supplied bayraktar tb 2 drones to ukraine played double game with russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Russia
  • Turkey
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
1

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
2

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
3

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.