Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान

Ukraine Drone Strike Russia: युक्रेनने सलग सहाव्या रात्री बेलगोरोड आणि रोस्तोवमधील रशियन ई-कॉमर्स कंपनी वाइल्डबेरीजच्या गोदामांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर ड्रोन हल्ले केले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 25, 2026 | 01:21 PM
ukraine drone strike russia belgorod rostov wildberries energy plant

ukraine drone strike russia belgorod rostov wildberries energy plant

Follow Us
Follow Us:
  • सलग ६ व्या रात्री आक्रमक ड्रोन हल्ला
  • ई-कॉमर्स अन् ऊर्जानिर्मिती केंद्रे लक्ष्य
  • लष्करी पुरवठा साखळीवर थेट प्रहार

रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine war) लष्करी संघर्ष आता केवळ सीमेवरील युद्धभूमीपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो थेट रशियाच्या आर्थिक आणि औद्योगिक पायाभूत सुविधांच्या मुळावर उठला आहे. २५ जुलै २०२६ च्या मध्यरात्री युक्रेनियन सैन्याने रशियातील बेलगोरोड आणि रोस्तोव या प्रदेशांवर सलग सहाव्या रात्री क्षेपणास्त्र-सदृश ड्रोन्सचा मोठा मारा केला. या धुवाधार हल्ल्यामध्ये रशियाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘वाइल्डबेरीज’ (Wildberries) च्या अनेक मोठ्या लॉजिस्टिक्स सेंटर्ससह मुख्य वीज आणि ऊर्जा केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास बेलगोरोड शहरात एकापाठोपाठ एक अनेक भीषण स्फोट झाले. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटांनंतर व्यावसायिक गोदामे आणि वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रांना भीषण आग लागली. बेलगोरोडचे महापौर व्हॅलेंटिन डेमिडोव्ह आणि कार्यवाहक राज्यपाल अलेक्सायंडर शुवायेव्ह यांनी या हल्ल्यात नागरी मालमत्तांचे मोठे नुकसान झाल्याचे आणि किमान एक नागरिक गंभीर जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. त्याच वेळी रोस्तोव-ऑन-डॉन शहरातही अनेक व्यावसायिक इमारती आणि मुख्य गॅस पाइपलाइन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे समोर आले आहे.

‘वाइल्डबेरीज’ गोदामांवर सलग हल्ले का?

‘रशियाची ॲमेझॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाइल्डबेरीज कंपनीची गोदामे गेल्या आठवडाभरापासून युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य बनली आहेत. यामागील कारण स्पष्ट करताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, ही लॉजिस्टिक्स केंद्रे केवळ नागरी खरेदी-विक्रीपुरती मर्यादित नसून रशियन सैन्याला आवश्यक असणारी लष्करी उपकरणे, ड्रोन्सचे पार्ट आणि नेव्हिगेशन यंत्रणा पुरवण्याचे मुख्य केंद्र बनली आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा

कंपनीच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर मिलिटरी ग्रेड बॉडी आर्मर, हेल्मेट्स आणि टेक्निकल गियर्स उघडपणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याने युक्रेनच्या सशस्त्र दलांनी या सर्व गोदामांना “कायदेशीर लष्करी लक्ष्य” (Legitimate Military Targets) घोषित केले आहे. गेल्या ६ दिवसांत सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को, त्हेर, क्रिमिया आणि आता बेलगोरोड येथील गोदामांवर लागोपाठ हल्ले करून युक्रेनने रशियन लष्कराची लॉजिस्टिक्स पुरवठा साखळी पूर्णपणे खिळखिळी केली आहे.

🇷🇺🇺🇦 While several Wildberries warehouses have been decimated by Ukrainian strikes, this one in Yekaterinburg had a narrow escape, with the drone missing the main building and slamming into the parking lot Wildberries is Russia’s equivalent to Amazon, and Ukraine defends… — Mario Nawfal (@MarioNawfal) July 25, 2026

credit – social media and Twitter

ऊर्जा पायाभूत सुविधांना मोठा तडाखा

या नव्या रणनीतीअंतर्गत युक्रेनियन सैन्याने आता रशियाच्या अंतर्भागातील ऊर्जा क्षेत्रावरही प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. उपग्रह छायाचित्रांनुसार, बेलगोरोडमधील प्रसिद्ध ‘लुच’ (Luch) औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि शहराला वीज पुरवणारे मुख्य सब-स्टेशन या ड्रोन हल्ल्यात गंभीररीत्या बाधित झाले आहे. यामुळे अनेक भागांतील वीज आणि गॅस पुरवठा अचानक खंडित झाला असून रशियन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Aramco: होदेदाहचा सूड! येमेनी ड्रोन्सचा सौदीच्या अरामको रिफायनरीवर भयानक क्षेपणास्त्र हल्ला; अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित

दरम्यान, या आक्रमक कारवाईच्या पार्श्वभूमीवर युक्रेनियन संरक्षण कंपनी ‘स्कायफॉल’ने (Skyfall) आपला नवीन ‘जेटकिलर’ (JetKiller) इंटरसेप्टर ड्रोन जगासमोर आणला आहे, जो रशियन हवाई हल्ल्यांचा यशस्वी मुकाबला करण्यास सक्षम आहे. रशियाच्या व्यापारी आणि ऊर्जा क्षेत्राला बसलेल्या या सलग फटक्यांमुळे रशियन अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत असून बाधित क्षेत्रांमध्ये आपत्कालीन बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Web Title: Ukraine drone strike russia belgorod rostov wildberries energy plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Russia and Ukraine war
  • Russia Ukraine War Update
  • World news

संबंधित बातम्या

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा
1

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा

Bangladesh : बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ, ‘हे’ ठरले मुख्य कारण
2

Bangladesh : बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ, ‘हे’ ठरले मुख्य कारण

India-Bangladesh: सीमेवर लष्करी हालचाली वाढल्या; BSF आणि BGB आमनेसामने; ‘पुश-इन’वरून बांगलादेशचे गंभीर आरोप
3

India-Bangladesh: सीमेवर लष्करी हालचाली वाढल्या; BSF आणि BGB आमनेसामने; ‘पुश-इन’वरून बांगलादेशचे गंभीर आरोप

Saudi Prince: आत्महत्या की ओव्हरडोस? सौदी राजकुमाराचा लंडनच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दुर्दैवी अंत; कोरोनर कोर्टाने दिला अंतिम निकाल
4

Saudi Prince: आत्महत्या की ओव्हरडोस? सौदी राजकुमाराचा लंडनच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दुर्दैवी अंत; कोरोनर कोर्टाने दिला अंतिम निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.